23 September 2021 12:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

राणेंच्या विविध रिसॉर्टमधील कर्जाच्या आरोपांवर सोमैय्या अधिक माहिती देऊ शकतात | राऊतांच्या टोला

MLA Nitesh Rane

मुंबई, १० सप्टेंबर | कर्जाचे हप्ते भरले नाहीत म्हणून केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी निलम राणे आणि चिरंजीव नितेश राणे यांना लूकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणेंवर खोचक टीका केली आहे. केंद्राच्या गृहखात्याच्या सूचनेवरूनच राज्याच्या गृहखात्याने ही कारवाई केली आहे. हवं तर नितेश राणेंनी दिल्लीत जाऊन माहिती घ्यावी, असा खोचक टोलाही विनायक राऊत यांनी लगावला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राणेंच्या विविध रिसॉर्टमधील कर्जाच्या आरोपांवर सोमैय्या अधिक माहिती देऊ शकतात, राऊतांच्या टोला – Shivsena MP Vinayak Raut criticized MLA Nitesh Rane over lookout circular of DHFL loan :

विनायक राऊत यांनी मीडियाशी बोलताना लूकआऊट नोटिसच्या मुद्द्यावरून नितेश राणेंवर टीकास्त्र सोडलं. डिएचएफल फायनान्स कंपनीच्या संचालकांनी या प्रकरणी केंद्राच्या गृहखात्याकडे लेखी तक्रार केली आहे. आमची रक्कम देणं असल्याने या दोघांना देशाबाहेर जावू देवू नका असं या तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या सूचना केंद्र सरकारच्या गृहखात्याने राज्य सरकारच्या गृहखात्याला दिल्या आहेत. याबाबतची अधिक माहिती नितेश राणेंनी दिल्लीत जावून मिळवावी, असा खोचक सल्ला राऊत यांनी दिला.

नारायण राणे भाजपमध्ये येण्यापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही वर्षापूर्वी नितेश राणे यांनी विविध रिसॉर्टसाठी घेतलेल्या कर्जाचा आरोप केला होतो. त्यामुळे याबाबत किरीट सोमय्यांकडून अधिक माहिती मिळू शकेल, असा चिमटा राऊत यांनी काढला. लूकआऊट नोटीसही कायद्यानुसार आहे. जी कारवाई होतेय ती केंद्र सरकारच्या निर्देशाने होतेय, असा दावाही त्यांनी केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsena MP Vinayak Raut criticized MLA Nitesh Rane over lookout circular of DHFL loan.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x