13 December 2024 2:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा
x

सुशांतसिंग राजपूतप्रकरणी ED सुद्धा खटला दाखल करु शकते - देवेंद्र फडणवीस

CBI demands, Sushant Singh Rajput case, ED, Devendra Fadnavis

मुंबई, ३१ जुलै : विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, या प्रकरणी लोकांना वाटते सीबीआय चौकशी व्हावी मात्र राज्य सरकार त्यात आडकाठी करत आहे.

सुशांतसिंगच्या आत्महत्येचा सीबीआय तपास व्हावा, अशी मोठ्या प्रमाणात जनभावना आहे. पण, सरकारची इच्छा नसल्याचे दिसून येते. मात्र, याप्रकरणात मनी लॉड्रींग आणि गैरवर्तन असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीकडून किमान एक ईसीआयआर दाखल करण्यात येऊ शकते, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दरम्यान, हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची गरज नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही बिहार पोलीस केवळ प्राथमिक चौकशीसाठी आले होते, मुंबई पोलीस चांगल्याप्रकारे तपास करत असून सीबीआयकडे तपास देण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान बिहार पोलीस येथे आले असावेत कारण तेथे स्वतंत्र तक्रार दाखल केली गेली होती. परंतु मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने आहे आणि योग्य चौकशी करेल. हा खटला सीबीआयकडे सोपविण्याची गरज नाही, महाराष्ट्र पोलीस तपास करण्यास सक्षम आहेत असं राज्य सरकारने म्हटलं आहे.

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात काल अनेक घडामोडी घडल्या. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या बिहार पोलिसांनी तपासाचा धडाका लावला. काल बिहार पोलिसांनी अभिनेत्री अंकिता लोखंडेची सुमारे तासभर चौकशी केली. त्याकरता बिहार पोलीस अंकिता लोखंडेच्या घरी पोहचले. यावेळी त्यांनी अंकिताची सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी चौकशी केली. दरम्यान, आज सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी पाटणा राज्य पोलिसांकडून केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे (सीबीआय) चौकशीचे हस्तांतरण करण्याची मागणी करणारे एक पत्र याचिका पटना हायकोर्टात दाखल करण्यात आले आहे.

 

News English Summary: Leader of Opposition in the Assembly Devendra Fadnavis has targeted the Chief Minister by tweeting. He said that in this case, people think that there should be a CBI inquiry but the state government is obstructing it.

News English Title: CBI demands Sushant Singh Rajput case ED can file case Devendra Fadnavis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x