12 December 2024 7:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
x

मनी लॉन्ड्रिंगच्या आडून सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ईडी'ची उडी

Bollywood actor Sushant Singh Rajput, Suicide case, ED to probe, 15 crore transaction

मुंबई, ३१ जुलै : सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणामध्ये आता ईडीनेही कारवाई केली आहे. ईडीने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सुशांतचे वडिल केके सिंग यांनी बिहारमध्ये रिया चक्रवर्तीविरुद्ध तक्रार केली होती. ईडीने बिहार पोलिसांकडून याप्रकरणाची माहितीही मागवली. सुशांतच्या बँक अकाऊंटमधून २५ कोटी रुपयांच्या व्यवहाराबाबत बिहार पोलिसांकडून माहिती मागवल्याचं वृत्त आहे.

सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये पाटणा येथील राजेंद्रनगर पोलीस ठाण्यात एक तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी रिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांनी सुशांतकडून आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीआधारे बिहार पोलिसांचे एक पथक तपास करण्यासाठी मुंबईत आले. दरम्यान, रियाने धावपळ करत सुप्रीम कोर्टात धाव घेऊन सुशांत आत्महत्येचा तपास मुंबईतच केला जावं अशी मागणी करणारी याचिका केली होती.

बिहार पोलिसांनी सुशांतच्या सर्व बँक खात्यांचे व्यवहार तपासले. या तपासानंतर बिहार पोलिसांनी आर्थिक गुन्ह्यांचा सखोल तपास करणाऱ्या ईडीला एक पत्र पाठवले. पत्राद्वारे बिहार पोलिसांनी आर्थिक व्यवहारांच्या सखोल तपासणीची गरज असल्याचे सांगून चौकशी करण्याची विनंती केली. ईडीने मागणी केल्यानंतर बिहार पोलिसांनी सुशांतच्या वडिलांकडून प्राप्त तक्रारीची प्रत त्यांना पाठवून दिली आहे.

तत्पूर्वी, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची ईडीकडून चौकशी करावी अशी मागणी आजच केली होती. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण CBI विभागाकडे सोपवण्यात यावा, अशी भावना मोठ्याप्रमाणावर सामान्यांमध्ये आहे. परंतु, राज्य सरकार त्यासाठी तयार नाही. राज्य सरकारची ही आडमुठी भूमिका पाहता किमान सक्तवसुली संचलनालयाला ED याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी. कारण या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार आणि खंडणीखोरीचा पैलू समोर आला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

 

News English Summary: The ED has now taken action in the Sushant Singh suicide case. The ED has registered a case of money laundering against Riya Chakraborty and her brother Shovik Chakraborty. Sushant’s father KK Singh had lodged a complaint against Riya Chakraborty in Bihar.

News English Title: Bollywood actor Sushant Singh Rajput Suicide case ED to probe Rs 15 crore transaction News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x