15 December 2024 4:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

उष्मघातामुळे मृत्यू झालेल्या निष्पाप श्रीसदस्यांचा शिंदे समर्थक आमदाराकडून अपमान, म्हणाले 'दरवर्षी उष्माघाताने लोक मरतात'

MLA Sanjay Gaikawad

MLA Sanjay Gaikawad | दोन दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला लाखोंच्या संख्येनं श्री सदस्यांनी हजेरी लावली होती. मात्र या सोहळ्याला गालबोट लागलं. सोहळ्याला उपस्थित असलेल्या काही श्रीसदस्यांचा उष्मघातामुळे मृत्यू झाला. यावरून राज्य सरकारवर सर्वच बाजूने टीका सुरु आहे. उष्मघातामुळे नाही तर चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप देखील काही व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर करण्यात येत आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला गालबोट लागलं आणि अनेक निष्पाप श्रीसदस्यांचा उष्मघातामुळे मृत्यू झाला. त्यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली. मात्र आता या प्रकरणाला वेगळ वळण लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात जे मृत्यू झाले ते उष्मघातामुळे नव्हे तर चेंगराचेंगरीमुळे झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. एकाबाजूला अनेक निष्पाप श्रीसदस्यांचा उष्मघातामुळे मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचं आभाळ कोसळलं आहे. संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त होतं असताना दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार मृत्यू पावलेल्या निष्पाप श्रीसदस्यांची अप्रत्यक्षरीत्या खिल्ली उडवत असल्याने आता अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या तमाम श्रीसदस्यांमध्ये संतापाची लाट येऊ शकते. त्याला कारण ठाकरे आहेत शिंदे समर्थक आमदार. समाज माध्यमांवर आता जोरदार टीका सुरु झाली आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधकांना लक्ष करताना उष्मघातामुळे मृत्यू पावलेल्या निष्पाप श्रीसदस्यांचा अपमान केला आहे. त्यांच्या धक्कादायक विधानामुळे सर्वत्र संतापाची लाट येण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, असे दरवर्षी उष्माघाताने लोक मरतात. त्याची जबाबदारी संजय राऊत घेणार का? असं धक्कादायक विधान संजय गायकवाड यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

उष्माघाताची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यावर संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मग अडीच हजार लोक उष्माघाताने मेली याची जबाबदारी संजय राउत घेणार का? दरवर्षी लोक मरतात याची जबाबदरी संजय राऊत घेणार का? असं धक्कादायक विधान संजय गायकवाड यांनी केलं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shinde Samarthk MLA Sanjay Gaikawad made controvercial statment on Shree Sevak Dead because of Heat Wave check details on 19 April 2023.

हॅशटॅग्स

#MLA Sanjay Gaikawad(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x