24 March 2023 5:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ChatGPT Job Effect | चॅट जीपीटी'मुळे या क्षेत्रातील नोकऱ्यांना प्रचंड धोका, कोणत्या नोकऱ्या सुरक्षित? लिस्ट मध्ये तुमची नोकरी कोणती? Accenture Job Loss | आयटी क्षेत्रात भूकंप, दिग्गज कंपनी अ‍ॅक्सेन्चर 19,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार OnePlus Nord CE 3 Lite 5G | वनप्लसचा 108 MP कॅमेरा असलेला स्वस्त Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन लाँच होणार, किंमत-फीचर्स? Hindenburg Report on Block Inc | अदानींनंतर हिंडनबर्गचा बॉम्ब या उद्योगपती फुटला, शेअर्स 20 टक्क्यांनी कोसळले Numerology Horoscope | 24 मार्च, तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Deep Industries Share Price | या शेअरने 552 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा, स्टॉक स्प्लिटचा फायदा घ्या Sera Investment Share Price | लॉटरीच लागली! गुंतवणुकदारांना 454 टक्के परतावा दिल्यानंतर आता हा शेअर स्प्लिट होतोय
x

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला तुफान प्रतिसाद, बिथरलेल्या भाजपचं महागाई-बेरोजगारीपेक्षा गंभीर मुद्दावर ट्विट, राहुल गांधींचं टी-शर्ट किती रुपयांचं?

Rahul Gandhi

Bharat Jodo Yatra | भारत जोडो यात्रेवर असलेले काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना देशभरात मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे ते आता सर्व भारतभर यात्रा घेऊन पोहोचणार असल्याने काँगेसमध्ये जोश आल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे या यात्रेत राहुल गांधी यांनी सामान्य लोकांशी संबंधित महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर भर दिला असून त्यात ते सर्वत्र पत्रकार परिषद आणि थेट लोकांना संबोधित करत आहेत. परिणामी भाजपाला नेमकं काय करावं हे उमगतं नसल्याने त्यांनी राहुल गांधीच्या टीशर्टचा मुद्दा आणि त्याची किंमत यावरून ट्विट केल्याने भाजपाला मोठ्या टीकेचा सामना करावा लागत आहे. तुमच्यासाठी हाच राष्ट्रीय मुद्दा उरला आहे का? आणि दुसऱ्यांच्या कपड्यांवर लक्ष देण्यापेक्षा देशातील बेरोजगारी आणि महागाईवर लक्ष द्या असं अनेकांनी भाजपाला सुनावलं आहे.

या यात्रे दरम्यान राहुल गांधी यांनी परिधान केलेल्या सफेद टी-शर्टचा फोटो भाजपने ट्विट केला आहे. भाजपच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये राहुल यांच्या या टी-शर्टची किंमत 41 हजार 257 रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे. कॉंग्रेसचे खासदार सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून या यात्रेला सुरुवात झाली. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत अनेक किलोमीटरपर्यंत कारकर्त्यांसहित सामान्य लोकांनी देखील भाग घेतल्याचं पाहायला मिळतंय.

भाजपने उचलेल्या मुद्यावर नेटिझन्सकडून भाजपच्या दर्जाची फिरकी :
भाजपच्या ट्विटर हँडलवरून राहुल गांधी यांच्या फोटोचा फोटो तसेच भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी घातलेल्या टी-शर्टचा फोटोही ट्विट करण्यात आला आहे. या ट्विटनुसार, हा पांढरा पोलो टी-शर्ट बर्बेरी कंपनीचा असून त्याची किंमत 41 हजार 257 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या ट्विटसोबत कॅप्शनमध्ये तंजिया स्टाईलमध्ये लिहिले आहे की, “भारता देखो’. ही यात्रा १२ राज्यांतून जाणार असून, जम्मू-काश्मीरमध्ये त्याचा समारोप होणार आहे. काँग्रेसच्या मते ही यात्रा सुमारे 150 दिवस चालणार आहे. या काळात एकूण ३,५०० किलोमीटर अंतर पार केले जाणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये चिंता व्यक्त केली जातं असून दुसऱ्या बाजूने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सुद्धा कार्यरत झाल्याने भाजपाची दुहेरी डोकेदुखी सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. मुद्दे मिळत नसल्याने काही तरी हास्यास्पद मुद्दे देशात सत्ता असलेला पक्ष उचलत असल्याने नेटिझन्स भाजपाची खिल्ली उडवत आहेत.

नेटिझन्सकडून भाजपच्या दर्जाची फिरकी आणि मोदींच्या लाइफस्टाइलचे पुरावे दिले :
दरम्यान, अनेक नेटिझन्स यावरून भाजपाची जोरदार फिरकी घेत आहेत. अनेकांनी भाजपच्या मुद्द्यांवर व्यक्त होता तुमची कीव येते असं सांगताना भाजप बिथरल्याने असे अर्थहीन मुद्दे काढून स्वतःचा दर्जा सिद्ध करतंय असं म्हटलं आहे. अनेकांनी मोदींच्या लाइफस्टाइल संबंधित पुरावे आणि वृत्त देत प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Rahul Gandhi on Bharat Jodo Yatra check details 09 September 2022.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x