14 May 2021 3:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
दिल्लीकरांसाठी देवदूत ठरलेल्या बी श्रीनिवास यांच्याविरोधात क्राईम ब्रांच फेरा | मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा संताप 91.6 टक्के परिणामकारक रशियन स्पुतनिक लसीची भारतातील प्रति डोस किंमत 995 रुपये तुमच्या तिथे चहात बिस्किटं बुडत असतील, आमच्याकडे चहातंच पूर्ण देश बुडाला - काँग्रेस प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत, पंतप्रधान, गृहमंत्री गायब - संजय राऊत कोरोना आपत्ती | जाहीर आकडेवारी पेक्षा भारत आणि मेक्सिकोमध्ये दुप्पट मृत्यू - अमेरिकन इंस्टीट्यूटचं विश्लेषण राज्य सरकारचं शिष्टमंडळाने राज्यपालांना भेटलं, पंतप्रधानांची वेळ मागणार असल्याचे जाहीर होताच.... मराठा आरक्षण | केंद्राकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल
x

जीत कर हारने वाले को केजरीवाल कहते है - शशी थरूर

Delhi Chief Minister Arvind Kejriwal, Kanhaiya Kumar sedition case, Shashi Tharoor

नवी दिल्ली: जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी दिल्ली सरकारने परवानगी दिली आहे. यावरुन काँग्रेसचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी टि्वट करुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. जीतकर हारनेवाले को केजरीवाल कहते हैं, असा टोला त्यांनी लगावला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

थरुर यांनी हिंदी चित्रपट ‘बाजीगर’ चा एक डायलॉगचा उल्लेख करताना केजरीवाल यांच्यावर टीका केली. त्यांनी लिहिले की, हारकर जीतनेवाले को बाजीगर कहते हैं, लेकिन जीतकर हारने वाले को केजरीवाल कहते हैं. इथेच न थांबता थरुर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केजरीवाल यांच्या भेटीवरही भाष्य केले. आता पाच वर्षे आपचे (आम आदमी पार्टी) असेच चालणार. शहा केजरीवाल (ओह सॉरी) वाह केजरीवाल !, अशी टिप्पणी त्यांनी केली.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार आणि इतर नऊ जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याला दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने पोलिसांना हिरवा कंदील दाखवल्यानंतर याचे राजकीय पडसाद उमटू लागले होते. काँग्रेस नेते आणि खासदार पी चिदंबरम यांनी दिल्लीतील आप सरकारच्या निर्णयावर टीका केली होती.

चिदंबरम यांनी शनिवारी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशद्रोहाचा कायदा नक्की काय आहे हे समजून घेण्यात केंद्र सरकार इतकेच दिल्ली सरकार अपयशी ठरले आहे. कन्हैय्या कुमार आणि इतरांविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याला हिरवा कंदील दाखविण्याच्या दिल्ली सरकारच्या निर्णयाचा मी विरोध करतो. या निर्णयाशी मी सहमत नाही असं म्हटलं होतं.

तत्पूर्वी दिल्ली सरकारच्या या निर्णयानंतर कन्हैया कुमार याने देखील प्रतिक्रिया व्यक्त केली होती. माझ्या विरोधात राजद्रोहाचा खटला चालवण्याला मंजुरी दिल्याबद्दल मी दिल्ली सरकारला धन्यवाद देतो. हे प्रकरण गंभीरपणे घ्यावे अशी मी दिल्ली पोलिस आणि वकिलांना आग्रह करतो. या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टात जलद गतीने सुनावणी व्हावी आणि टीव्हीवाल्या ‘आपकी अदालत’च्या जागी कायद्याच्या ‘अदालत’मध्ये न्याय मिळावा. सत्यमेव जयते, अशा शब्दांत कन्हैया कुमार याने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

काय आहे प्रकरण?
२०१६ च्या फेब्रुवारी महिन्यात जवाहरलाल नेहरु विद्यापीठ परिसरात काही घोषणाबाजी करणाऱ्यांचे व्हिडीओ समोर आले होते. या घोषणा देशविरोधी होत्या. जेएनयूच्या विद्यार्थी परिषदेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांविरोधात या प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाची फाईल गेल्या काही महिन्यांपासून पडून होती. आता दिल्लीतील केजरीवाल सरकारने कन्हैय्या कुमारविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्यास संमती दिली आहे. त्यामुळे कन्हैय्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

 

News English Summery: Delhi government has given permission to file sedition case against former president of JNU Students’ Association Kanhaiyakumar. From this, Congress leader and former Union Minister Shashi Tharoor tweeted, targeting Chief Minister Arvind Kejriwal. They have said that Kejriwal is the winner. Tharoor criticized Kejriwal for referring to a dialogue in Hindi movie ‘Bajigar’. He wrote that the loser is called the bettor, but the loser is called the Kejriwal. Tharoor also spoke on the visits of Union Home Minister Amit Shah and Kejriwal. For five years now, your (Aam Aadmi Party) will do the same. Shah Kejriwal (oh so sorry) Wow Kejriwal!

 

Web News Title: story congress leader Shashi Tharoor slams on Delhi Chief Minister Arvind Kejriwal on Kanhaiya Kumar sedition case.

हॅशटॅग्स

#Arvind Kejariwal(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x