24 November 2020 3:07 PM
अँप डाउनलोड

विकासाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्यानेच त्यांचं डिपॉझिट जप्त | पंतप्रधानांचा काँग्रेसवर घणाघात

PM Narendra Modi, Bihar Assembly election 2020

नवी दिल्ली, ११ नोव्हेंबर: देशाचा विकास, राज्यांचा विकास हे आजचं सर्वात मोठं आव्हान आहे आणि विकासाचा हाच मुद्दा येणाऱ्या निवडणुकीचा मुख्य मुद्दा राहणार आहे. हे बिहारच्या निवडणुकीतूनही सिद्ध झालं आहे, असं सांगतानाच या लोकांना हा मुद्दा लक्षात येत नाहीये, म्हणूनच त्यांची वारंवार जमानत जप्त होत आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी काँग्रेसचं नाव न घेता केली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

महान देशातील महान जनतेचे आभार व्यक्त करत असल्याचं मोदींनी यावेळी म्हटलं. “निवडणुकीत यश (Bihar Assembly Election 2020) दिलं फक्त यासाठी नाही तर लोकशाहीचा उत्सव साजरा केला याबद्दल मी आभार मानत असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं. काल सकाळपासून ते रात्रीपर्यंत सर्वांच्या नजरा टीव्ही आणि ट्विटरवर होत्या. लोकशाहीबद्दल भारतीयांचा जो विश्वास आहे तो जगात कुठेही पहायला मिळत नाही. विजय, पराभव आपल्या जागी आहे पण निवडणूक प्रक्रिया सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे,” असं मोदींनी यावेळी सांगितलं.

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएने बहुमताचा आकडा गाठला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने देखील उत्तर यश मिळविलं असून आज हजारो भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील भारतीय जनता पक्ष कार्यालयासमोर जमून दणक्यात सेलिब्रेशन केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही उपस्थित होते.

देशाच्या राजकारणाचा मुख्य आधार हा विकास हाच आहे. बँक खाते, गॅस कनेक्शन, घर, चांगले रस्ते, रेल्वे स्टेशन, विमानतळ, शाळा हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. देशाचा विकास, राज्यांचा विकास हे आजचं सर्वात मोठं आव्हान आहे आणि विकासाचा हाच मुद्दा येणाऱ्या निवडणुकीचा मुख्य मुद्दा राहणार आहे. हे बिहारच्या निवडणुकीतूनही सिद्ध झालं आहे, असं सांगातानाच या लोकांना हा मुद्दा लक्षात येत नाहीये, म्हणूनच त्यांची वारंवार जमानत जप्त होत आहे, असं मोदी म्हणाले. एनडीएवर जनता जो स्नेह दाखवला त्याचं कारण विकास आहे. देशाला पुढे नेण्यासाठी काम करत राहणार, असा मी विश्वास देतो, असंही ते म्हणाले.

 

News English Summary: The development of the country, the development of the states is the biggest challenge today and this issue of development will be the main issue of the coming elections. This has been proved by the Bihar elections as well, saying that these people do not realize this issue, that is why their bail is being confiscated again and again, said Prime Minister Narendra Modi without mentioning the name of the Congress.

News English Title: Prime Minister Narendra Modi address party workers after winning Bihar Assembly election 2020 News updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x