28 March 2023 1:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Khadim India Share Price | या कंपनी व्यवस्थापनतील फेरबदलांमुळे हा शेअर फोकसमध्ये आला, गुंतवणूक करावी का? Stocks To Buy | स्वस्त शेअर आश्चर्यकारक परतावा, किंमत 100 रुपयांपेक्षा ही कमी, अल्पावधीत मिळणार 60 टक्के परतावा, लिस्ट सेव्ह करा SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या
x

Bharat Jodo Yatra | भाजपाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात राहुल गांधीना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Bharat Jodo Yatra

Bharat Jodo Yatra | राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. ही यात्रा महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणार आहे. त्यापूर्वीच राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. राहुल गांधी मध्यप्रदेशात येताच त्यांना बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली आहे.

एका मिठाईच्या दुकानात पत्रं पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पत्राची गंभीर दखल घेतली असून अज्ञात इसमाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. येत्या 24 तारखेला राहुल गांधी यांची यात्रा मध्यप्रदेशातील इंदूर येथे जाणार आहे. त्यापूर्वीच हे धमकीचं पत्रं आलं आहे. हे पत्रं कुणी दिलं? पत्रं कधी आणून ठेवलं याबाबतची काहीच माहिती नाहीये. त्यामुळे अज्ञात व्यक्तीला पकडणं पोलिसांसाठी आव्हान ठरणार आहे.

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाचे आंदोलन केले. यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. सावरकर वादात भाजयुमो आक्रमक झाली.जोरदार घोषणाबाजी करत भाजयुमोची पुण्यात काँग्रेस भवनात घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्ते दादरमधील टिळक भवनाकडे जाणार होते. मात्र पोलिसांनी दादर फुल मार्केटजवळच या कार्यकर्त्यांना रोखलं. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड केली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bharat Jodo Yatra anonymous letter threatens to kill Rahul Gandhi check details on 18 November 2022.

हॅशटॅग्स

Bharat Jodo Yatra(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x