26 May 2022 7:22 PM
अँप डाउनलोड

जस्टीस लोयांची नागपुरात हत्या झाली | सचिन वाझे तपास अधिकारी राहिले तर यांचं बिंग फुटेल - आ. जाधव

MLA Bhaskar Jadhav, Justice Loya death case

मुंबई, ०९ मार्च: आज देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात हसमुख हिरे प्रकरणी थेट टीआरपी घोटाळा उघडकीस आणणारे पोलीस अधिकारी सचिन वझेंवर खून केल्याचे आरोप केले. तसेच हसमुख हिरेन यांच्या पत्नीने तक्रारीत काय म्हटले त्याचं वाचन करून दाखवलं. त्यामुळे फडणवीसांवर समाज माध्यमांवर आणि थेट विधानसभेत आरोप होतं असून त्यासाठी त्यांच्या काळातील प्रकरणात त्यांनी कशी बघ्याची भूमिका घेतली होती ते समोर येऊ लागलं आहे.

दरम्यान, याबाबत आज शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विरोधकांवर आक्रमक निशाणा साधला, जाधव म्हणाले की, २०१८ मध्ये अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबून टाकले, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सासू आणि नवऱ्याच्या मृत्यूची चौकशी करावी असं पत्र दिलं, देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण दाबलं असंही म्हटलं, या प्रकरणाची चौकशी सचिन वाझे करत आहेत, म्हणून त्यांच्यावर आरोप करून त्यांना काढून टाकण्याची मागणी केली जातेय, पण सरकार सचिन वाझेंना काढणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला.

पुढे बोलताना जाधव यांनी, “यांचा लाडका पुत्र अर्णब गोस्वामीला सचिन वाझेंनी घरातून उचलून आणलं म्हणून यांना दु:ख झालेलं आहे. त्याचबरोबर जस्टीस लोयांची हत्या झाली. ती नागपूरमध्ये झाली. ती हत्या का झाली हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे. सचिन वाझे हा जर तपास अधिकारी राहिला तर यांचं बिंग फुटेल. यांना बेड्या पडतील. म्हणून ते सचिन वाझेच्या मागे लागले आहेत. म्हणून माझी सरकारला विनंती आहे की सरकारने सचिन वाझे यांना त्यांच्या पदावर कायम ठेवावं,” अशी मागणी केली.

 

News English Summary: MLA Bhaskar Jadhav said, “He is saddened that his beloved son Arnab Goswami was picked up from his house by Sachin Vaze. At the same time, Justice Lodha was assassinated. She was born in Nagpur. The Chief Minister should also explain why the murder took place. If Sachin Vaze remains the investigating officer, his binge will explode. They will be handcuffed. So they are after Sachin Vaze. Therefore, I request the government to keep Sachin Vaze in his post, ”he demanded.

News English Title: MLA Bhaskar Jadhav highlighted justice Loya death case in state assembly news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(688)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x