12 December 2024 4:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

उद्या राज ठाकरे यांची नांदेडमध्ये जाहीर सभा, पुन्हा मोदी-शहा लक्ष

MNS, Raj Thackeray, Narendra Modi, Amit Shah

नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाड्यात न उतरता भाजपच्या अडचणी राज्यभर सभा घेऊन वाढवत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभर जाहीर सभा घेऊन एकप्रकारे विधानसभेची तयारीच सुरु केल्याचे म्हटले जात आहे.

आज गुरुवार दि.११ एप्रिल २०१९ रोजी सायं.८.३० वा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे हे छत्रपती शिवाजी टर्मिनल येथून देवगिरी एक्सप्रेसने नांदेड करीता रवाना होतील. उद्या शुक्रवार दि १२ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ठीक ५:०० वाजता नवीन मुंडा मैदान, कृषि मार्केट समोर, नांदेड शहर, जि.नांदेड येथे राजसाहेब ठाकरे यांची जाहिर सभा होणार आहे.

मनसेकडून राज ठाकरे यांच्या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून, जवळपास राज्यभर मोदी आणि अमित शहा यांना लक्ष करून भाजपच्या अडचणी वाढविण्याची योजना असल्याचं समजतं. त्यामुळे सामान्य लोकांसोबत आता भाजपचं देखील राज ठाकरे यांच्या सभेकडे लक्ष लागलं आहे.

असा असेल राज ठाकरे यांचा संपूर्ण दौरा?

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x