23 September 2019 11:09 AM
अँप डाउनलोड

प्रयागराज येथे प्रियांका गांधींकडून हनुमान मंदिरात पूजन, गंगा यात्रेला सुरुवात

Congress, Priyanka Gandhi, Ganga Yatra

प्रयागराज : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. दरम्यान, कुंभ मेळ्यात भाजपचच्या देशभरातील नेत्यांनी आणि स्वतः मोदींनी गंगा स्नान केले होते. त्यानंतर उत्तर प्रदेशात महत्वाची जवाबदारी देण्यात आलेल्या प्रियांका गांधी यांनी देखील आज गंगा दर्शनाला आल्या आहेत.

तत्पूर्वी त्यांनी प्रयागराज येथील हनुमान मंदिरात जाऊन पूजा आणि आरती करत आशीर्वाद घेतले. सदर कार्यक्रम आटपल्यानंतर त्या गंगा नदीवर जाऊन गंगा यात्रेला जाऊन उत्तर प्रदेशात जोरदारपणे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात करून भाजपाला शह देतील असं म्हटलं जात आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी यांना मोठा प्रतिसाद मिळत असून, काँग्रेस कार्यकर्ते देखील जोरदारपणे कामाला लागले आहेत. तसेच पक्षपासून दुरावलेले कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील जोशमध्ये पुन्हा लोकसभेच्या आखाड्यात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.

 

 

 

 

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Congress(253)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या