23 March 2023 5:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Realme Narzo 50 5G | रियलमी Narzo 50 5G स्मार्टफोनवर 26% डिस्काउंट, जबरदस्त ऑफर्सबद्दल जाणून घ्या Apar Industries Share Price | चमत्कारी शेअर! 10000 रुपयांवर 20 लाख रुपये परतावा, गुंतवणूकदार कशी कमाई करत आहेत पहा Indigo Paints Share Price | हा शेअर 50 परतावा देईल, मोतीलाल ओसवाल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, फायदा उचला Gratuity Calculator | तुम्ही 7 वर्षे नोकरी केली असेल तर तुम्हाला किती लाख ग्रॅच्युइटीची रक्कम मिळेल? गणित जाणून घ्या SBC Exports Share Price | या पेनी शेअरमध्ये वाढ होतेय, शेअरची किंमत 17 रुपये, गुंतवणुक करण्याआधी डिटेल्स वाचा Sula Vineyards Share Price | दारू नव्हे तर या दारू कंपनीच्या शेअरची खरेदी करा, स्टॉक मजबूत परतावा देईल, डिटेल्स पहा SBI Share Price | सरकारी एसबीआय बँकेचा शेअर तेजीत येतोय, शेअरची वाटचाल आणि टार्गेट प्राईस पाहून घ्या
x

पूरस्थिती मुंबईतच नाही, जगभर निर्माण होतेय | तिथे तर महापालिका आमच्या ताब्यात नाहीत - मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray

मुंबई, ०५ ऑगस्ट | राज्य सरकारने राज्यातील 25 जिल्ह्यांतील निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, मुंबई लोकल कधी सुरू होणार? हा प्रश्न अनिर्णित आहे. त्यावर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच मोठं विधान केलं आहे. मुंबईची लोकल सुरू करण्याचा विचार सुरू आहे. पण जबाबदारीचं भान ठेवूनच हा निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लोकल सुरू होण्याच्या मुंबईकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते खार एच पश्चिम विभागातील पालिका विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी हे दिलासादायक विधान केलं. महाराष्ट्रातील परिस्थिती संमिश्र आहे. काही ठिकाणी बऱ्यापैकी सुधारली आहे. काही ठिकाणी चिंता करायला लागू नये अशी आहे. त्यामुळे काही ठिकाणी निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईवर नैसर्गिक आपत्ती यायच्या त्या येतच आहेत. सध्या एक नवीन संकट आहे. काही दिवसांचा, काही महिन्यांचा पाऊस काही तासांत पडतोय. पूरस्थिती मुंबईतच नाही, जगभर निर्माण होतेय. तिथे तर महापालिका काही आमच्या ताब्यात नाहीयेत. बीजिंग किंवा जिथे कुठे जगभरात पूर आले, त्या महापालिका काही आमच्या ताब्यात नाहीयेत. पण तिथेही पूर आले. आता त्याला जबाबदार कोण? हे तिथे कोण असतील ते बोलत असतील”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mumbai local trains to open for all soon says Chief Minister Uddhav Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x