24 June 2019 3:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
सेनेचा मुख्यमंत्र्यांना शह? जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याची जलसंधारण मंत्र्यांची कबुली VIDEO: बिल्डरकडून फसवणूक; गुजराती कुटुंबसुद्धा मनसेच्या आश्रयाला; दणका मिळताच २१ लाख मिळाले पोटनिवडणूक: चंद्रपूर नगरपरिषदेत काँग्रेसचा भाजपाला दणका; पुण्यात भाजपचा आयात उमेदवार विजयी पाक सैन्याच्या इस्पितळात भीषण स्फोट; दहशतवादी मसूदच्या मृत्यूच्या तिसऱ्यांदा बातम्या? तर युतीमध्ये पुण्यात शिवसेनाला एकही जागा नाही, दानवेंच्या वक्तव्याने सेनेत संताप ५ वर्ष पिकविमा कंपन्यांची कार्यालये मुंबईत, शिवसेनेला फसवणूक-लूट विधानसभा आल्यावर दिसली रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता
x

विधानसभा निवडणुक: दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत राज्य भाजपची बैठक

विधानसभा निवडणुक: दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत राज्य भाजपची बैठक

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांनंतर आता विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात बैठकांचे जोरदार सत्र सुरु झाले असून, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विशेष उपस्थितीत महाराष्ट्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक पार पडली. सदर बैठक भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती.

दरम्यान या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुभाष देशमुख आदी महाराष्ट्रातील भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत विधानसभा निवडणुकीशी संबंधित महत्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. मागील विधानसभा निवडणुकांत शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षातील संबंध कमालीचे ताणले होते. परंतु लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर उभय पक्षांनी संघर्षाच्या तलवारी म्यान करून एकत्र निवडणूक लढवल्या आणि त्याचे फळही त्यांना मिळाले. आता विधानसभा निवडणुकीत युती होणारच असे दोन्ही पक्षांचे नेते सांगत आहेत. दोन्ही पक्षांनी १३५ जागा लढवाव्यात, असा तोडगा सुचविण्यात आला आहे. परंतु त्यावर अजून एकमत झालेले नाही.

मराठी विवाह II अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Amit Shah(130)#Devendra Fadnavis(227)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या