28 May 2022 3:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Fake Reviews on e-Commerce | ई-कॉमर्स वेबसाइट्सवरील बनावट रिव्ह्यू | ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्यांवर लगाम लागणार Tata AIA Life Insurance | टाटा एआयए स्मार्ट व्हॅल्यू इन्कम इन्शुरन्स प्लॅन लाँच | पॉलिसीचे फायदे जाणून घ्या Multibagger Penny Stocks | अदाणींची या कंपनीत एन्ट्री | 1 महिन्यांत 7 रुपयांच्या शेअरने 160 टक्के परतावा Tesla Motors | भारतात होणार जगप्रसिद्ध टेस्ला कारचे उत्पादन? | एलॉन मस्क यांनी दिली मोठी माहिती CIBIL Score | चांगला सिबिल स्कोअर म्हणजे काय ज्यावर तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळेल | स्कोअर असा तपासा Drone Company Stocks | या 5 ड्रोन कंपन्यांचे शेअर्स खरेदीचा आताच विचार करा | दीर्घकाळात करोडपती व्हाल 1 June Rules | 1 जूनपूर्वी तुमची आवडती कार, बाईक किंवा स्कूटर खरेदी करा | नंतर खर्च किती वाढणार पहा
x

Breaking | अखेर संजय राठोडांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवला

Forest Minister Sanjay Rathod, Resigned, CM Uddhav Thackeray, Pooja Chavan

मुंबई, १६ फेब्रुवारी: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आज मातोश्रीवर संजय राठोड यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठकही पार पडणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर ही बैठक होणार का, हे देखील पाहणे महत्वाचे असणार आहे.

तर पक्ष किंवा सरकार अडचणीत येत असेल तर राजीनामा घेऊन ठेवावा असाही एक मतप्रवाह शिवसेनेत पाहायला मिळत आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर संजय राठोड यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात दबाव आहे. गेल्या काही दिवसांपासून राठोड अज्ञातवासात आहेत, त्यांनी या प्रकरणावर काहीही भाष्य केले नाही, मात्र बंजारा सामाजाने आणि पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांनी संजय राठोड यांना क्लिन चीट दिली आहे. मात्र या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सावध भूमिका घेतली आहे.

 

News English Summary: Forest Minister and Shiv Sena leader Sanjay Rathod, who was embroiled in controversy over the Pooja Chavan suicide case, has finally resigned. According to sources, Sanjay Rathod has sent his resignation to Matoshri. Therefore, now all eyes are on whether Chief Minister Uddhav Thackeray will accept his resignation or not.

News English Title: Forest Minister Sanjay Rathod sent resignations letter to CM Uddhav Thackeray over Pooja Chavan suicide case news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1153)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x