11 July 2020 1:05 PM
अँप डाउनलोड

भिवंडीत शिवसेनेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांचा मनसेमध्ये जाहीर प्रवेश

मुंबई : भिवंडीमध्ये शिवसेनेला मनसेकडून खिंडार पाडण्यात आलं असून शहरातील प्रमुख आणि तरुण कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवास्थानी मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. त्यावेळी राज ठाकरेंच्या व्यतिरिक्त मनसेचे नेते राजू पाटील हे देखील उपस्थित होते.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

या पदाधिकाऱ्यांमध्ये भारतीय विद्यार्थी सेनेचे शहर संघटक मनोज गूळवी यांचा सुद्धा समावेश असल्याने शिवसेनेला निवडणुकीच्या तोंडावर चांगलाच धक्का देण्यात आला आहे. मनोज गुळवींसोबत शेकडो तरुण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश घेतला आहे.

मनसे अध्यक्षांची सध्याची पक्ष विस्ताराची रणनीती पाहता ते दुसऱ्या पक्षातील मोठी नेते मंडळी पक्षात ओढण्यापेक्षा कार्यकर्ते आणि स्थानिक तरुण पदाधिकारी मनसेमध्ये आणण्यास अधिक उत्सुक असल्याचे दिसते. कारण निवडणूक ह्या केवळ नेत्यांच्या नाही तर कार्यकर्त्यांच्या जोरावरच जिंकता येतात हे त्यांना चांगलंच अवगत आहे.

त्यामुळे राज ठाकरेंच्या मनसे पक्षात भविष्यात अजूनही अनेक पक्षातील मोठे नेते आणि पदाधिकारी येण्यास उत्सुक असून त्याची प्रचिती लवकरच येईल असं मनसेच्या नेत्यांनी प्रसार माध्यमांना सूचित केलं आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x