7 August 2020 9:31 AM
अँप डाउनलोड

भिवंडी : शांती नगर येथे चार मजली इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, ५ जण जखमी

Bhiwandi, Building Collapsed

भिवंडी : येथील शांतीनगर परिसरातील एक ४ चार मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ४ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तर दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत अजून आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

मिळालेल्या माहितीनुसार, शांतीनगर परिसरातील पिरानीपाडा येथील ही इमारत रात्री अडीच वाजताच्या सुमारास कोसळली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि एनडीआरएफच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. रहिवाशांना इमारतीतून बाहेर काढण्यात येत असतानाच इमारत कोसळली. यात आपत्कालीन विभागाचे कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. दरम्यान, अद्यापही बचावकार्य सुरू असून ५ जणांना वाचवण्यात यश मिळाले आहे. जखमींना भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Thane(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x