21 March 2023 1:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Price Today | बाब्बो! आजही सोन्याचे नवे दर ऐकून थक्क व्हाल, तुमच्या शहरात 10 ग्रॅमचा नवा दर कितीवर पोहोचला Rail Vikas Nigam Share Price | या सरकारी कंपनीचा शेअर 65 रुपयांचा, शेअर्स खूप तेजीत, हा स्टॉकची खरेदी वाढण्याचं कारण? Godawari Power and ISPAT Share Price | ही कंपनी शेअर बायबॅक करणार, रेकॉर्ड तारीख आणि बायबॅक दर पाहून पैसे लावा Viral Video | काळजाचा ठोका चुकला! सिनेमाप्रमाणे घडलं, ती समुद्रात उडी मारणार इतक्यात टायगर शार्क आला आणि...? Children Mobile Addiction | मोबाइलचे व्यसन मुलांसाठी खूप धोकादायक, फॉलो करा या टिप्स, मुले स्वत: सोडून देतील मोबाईल Smart Metering Transition | उन्हाळ्यात वीज बिल कमी होईल, केंद्र सरकारने सांगितली पद्धत, त्यासाठी हे आजच करा SBI Bank Account Alert | एबीआय बँक ग्राहकांना महत्वाचा अलर्ट, तुमच्या खात्यातूनही पैसे कापले गेले असतील पहा, किती रक्कम?
x

KDMC | मनसेला मोठं खिंडार | मंदार हळबे भाजपमध्ये | मनसेचा निवडणुक मार्ग खडतर

KDMC, MNS leader Mandar Halbe, Raj Thackeray, MLA Raju Patil

कल्याण, ०२ फेब्रुवारी: कल्याण डोंबवली महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेने मनसेला काल मोठा धक्का दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह डोंबिवलीतील असंख्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. राजेश कदम हे पदाधिकारी असताना देखील त्यांना थेट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षावर राजेश कदम यांचा पक्षप्रवेश देऊन राजेश कदम यांचं कल्याण डोंबिवलीत राजकीय वजन वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. साहजिकच राजेश कदम यांच्या शिवसेना प्रवेशाने मनसेला मोठा फटका बसणार आहे.

मनसेचे कदम यांच्यासह मनसे विद्यार्थी संघटनेचे सागर जेधे, कल्याण तालुकाध्यक्ष अजरुन पाटील, दीपक भोसले आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. कदम हे पूर्वी शिवसेनेत होते. मनसेची स्थापना झाली त्यादिवपासून ते संस्थापक सदस्य होते. 2009 साली त्यांनी डोंबिवली विधानसभा मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढविली होती. विविध कल्पक आंदोलने करुन महापालिकेतील शिवसेना भाजप युतीला कायम जाब विचारून धारेवर धरणारे अशी कदम यांची प्रतिमा आहे. मनसेचा सच्च कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. काल त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

दरम्यान, सध्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातील मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या मतदारसंघात शिवसेना भाजपने मनसेला खिंडार पाडण्याचं काम सुरू केलं आहे. मनसेचे अनेक पदाधिकारी शिवसेना-भाजपाच्या वाटेवर असल्याचं समजतंय. मंदार हळबे हे आतापर्यंत २ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत, तर मागील विधानसभा निवडणुकीत मनसेकडून डोंबिवली मतदारसंघाची तिकीट हळबेंना देण्यात आली होती, तेव्हा ३७ हजारांनी मंदार हळबे यांचा पराभव झाला होता.

मंदार हळबे हे कल्याण-डोंबिवली महापालिकेत विरोधी पक्षनेतेही होते, सोमवारी शिवसेनेने मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह सागर जेधे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रवेश केला होता, त्यात मंगळवारी लगेचच मंदार हळबे यांचा भाजपा प्रवेश झाल्याने मनसेला डोंबिवलीत मोठे खिंडार पडल्याची चर्चा आहे.

 

News English Summary: At present, in the constituency of Raju Patil, the only MLA of MNS in Kalyan rural constituency, Shiv Sena BJP has started the work of splitting MNS. It is understood that many MNS office bearers are on the path of Shiv Sena-BJP. Mandar Halbe has been elected as a corporator twice so far, while in the last assembly elections, when MNS had given the ticket to Dombivali constituency to Halbe, Mandar Halbe was defeated by 37,000.

News English Title: KDMC MNS leader Mandar Halbe join BJP party before election news updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x