19 April 2024 9:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

महिलांचा अपमान झाला आता इंदुरीकर महाराजांकडून शिक्षकांची खिल्ली

Story Indurikar Maharaj Kirtan

नगर: अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांची आता शिक्षकांची खिल्ली उडवणारी क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये शिक्षक वर्गात येऊन वेळ कसा वाया घालवतात? हे सांगत त्यांनी शिक्षकांवर टीका केली आहे. त्यामुळे आता शिक्षक संघटना इंदुरीकर महाराजांवर नाराज झाल्या आहेत.

इंदुरीकर महाराज म्हणाले, शिक्षक ३५ मिनिटांच्या तासिकेत पाच मिनिटं तर शिक्षक वर्गात जाण्यासाठी घालवतात. त्यानंतर फळा पुसायला पाच मिनिटं घालवतात. आदल्या दिवशी काय झालं ते सांगायला आणखी पाच मिनिटं घेतात. उरलेल्या वेळात उद्याच्या तासाला काय शिकणार हे सांगायलाही पाच मिनिटं घेतात. त्यानंतर काय मग तास संपला हे सांगायचीच वेळ येते. असं म्हणत शिक्षक त्यांना शिकवण्याची तासिका आटोपती घेतात असंही इंदुरीकर महाराज या क्लिपमध्ये सांगत आहेत. दरम्यान, इंदुरीकर महाराज यांची ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिक्षक संघटनांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. तर इंदुरीकर महाराज हे स्वतः शिक्षक आहेत त्यांनी शिक्षकांची प्रतिमा मलीन करु नये असंही काही शिक्षकांनी सुचवलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

तत्पूर्वी, ओझर येथे झालेल्या किर्तनात ” सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते ” असे वक्तव्य केलं होतं. इंदोरीकर महाराज यांनी केलेले वक्तव्य हे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे. हे वक्तव्य म्हणजे PCPNDT कायद्यानुसार कलम २२ चे उल्लंघन असल्याचा आरोप या समितीच्या सदस्यांनी केला होता.

गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम २२’चं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडून इंदुरीकर यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वक्तव्याने हभप इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. आणि पुढे चालून गुन्हा सिद्ध झाल्यास ३ वर्षांचा कारावासाची या शिक्षेत तरतूद आहे.

‘मराठी कीर्तन व्हिडिओ’ या यूट्यूब चॅनेलद्वारे इंदुरीकर महाराजांचे किर्तन समाज माध्यमांवर प्रसिद्ध केले जातात. या व्हिडीओवरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये, ‘सम तिथीला स्त्री संग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’, असे महाराज म्हटले आहेत. तसेच, स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळवणारी मुलं होतात. टायमिंग हुकला का क्वालिटी खराब…असे विधान इंदुरीकर यांनी ४ जानेवारी रोजी यूट्युब चॅनेलवर अपलोड केलेल्या कीर्तनाच्या व्हिडिओमध्ये केले आहे. तसेच, पुराणकाळातील एक दाखलाही महाराजांनी यावेळी दिला होता.

 

Web Title: Story Indurikar Maharaj Kirtan clip viral again now Teachers associations not happy on the statement.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x