13 February 2025 5:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | आठव्या वेतन आयोगानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार, रक्कम जाणून घ्या Salary Vs Savings Account | 90% लोकांना माहिती नाही सॅलरी अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटमधील फरक, व्याजदर ते मिनिमम बॅलन्स अटी पहा Tax Exemption on HRA | पगारदारांनो, तुमचा HRA वर टॅक्स सवलत मिळणार का, कसा फायदा होईल समजून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त बचत करा या SBI फंडाच्या योजनेत, महिना 2500 रुपये एसआयपीवर 1.18 कोटी रुपये मिळतील SBI Home Loan | नोकरदारांना SBI बँकेकडून 35 लाखांचे गृहकर्ज हवे असल्यास महिना किती पगार असावा, योग्य माहिती जाणून घ्या Gratuity Money Alert | खाजगी पगारदारांसाठी 25 लाखांपर्यंत ग्रॅच्युईटी वाढली, तुमच्या खात्यात किती रक्कम जमा होईल इथे पहा Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
x

तर राज ठाकरे हिंदुत्वासोबत नाशिक महापालिकेप्रमाणे विकासाचा पॅटर्न औरंगाबाद'मध्ये राबवतील

Raj Thackeray, MNS Party, Aurangabad, Sambhajinagar

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. सध्या मनसेने हिंदुत्वाची कास धरली असली तरी राज ठाकरे हे एक विकासाचं व्हिजन असणारे राजकीय नेते असं आजही राज्यातील लोकांचं मत आहे. औरंगाबादमध्ये ते हिंदुत्वासोबत विकासाला देखील मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देतील अशीच शक्यता आहे. कारण हिंदुत्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पक्षासोबत बांधून ठेवेल तर विकासाचा प्रचार मतदाराला मनसेकडे आकर्षित करेल, अशी योजना असावी असं प्राथमिक स्तरावर दिसतं.

मागच्या वेळी जेव्हा राज ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी ‘औरंगाबाद व्हिजन कार्यक्रमात’ शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्तीशी संवाद साधला होता. त्यावेळी, उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी विकासासोबत औरंगाबाद शहर आणि राजकारणातील वास्तव सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला होता.

उपस्थित संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले होते की, ‘तुम्ही राजकारणाचे बळी ठरला आहात, घाबरून मतदान करता. एकदा डोळे उघडून नीट बघा, कानावरचे हात बाजूला काढा. आधी तुम्ही बदला मग शहर बदलेल. मनसेला संधी द्या, मी स्वच्छ आणि सुरक्षित शहर देतो.” असं आवाहन राज ठाकरे यांनी औरंगाबादवासीयांना दिलं होतं.

त्यावेळी औरंगाबाद व्हिजन कार्यक्रमात बोलताना त्यांनी राजकारणातील एक खंत व्यक्त केली होती की, ‘विकास कामांवर मतदान होतं याच्यावरचा माझा विश्वासच उडाला आहे. तुम्ही विकासाला मतदानच करत नाही. केवळ अडचणीच्या वेळीच तुम्हाला राज ठाकरे आठवतो असं सांगताना नाशिक महापालिकेत झाले तसे काम तुमच्या शहरात देखील होऊ शकतात ,”असा विश्वास त्यांनी औरंगाबादवासीयांना दिला होता.

औरंगाबाद शहरातील राजकारणावर बोट ठेवत त्यांनी काही स्थानिक मुद्दे उपस्थित केले होते. त्यांनी म्हटलं की, औरंगाबाद शहरात राजकारणी तुम्हाला भीती दाखवतात, निवडणुकीच्या वेळी दंगली घडवल्या की तुम्ही पुन्हा त्यांनाच मतदान करता, मग कशाला हवा तुम्हाला विकास असा घणाघात राज ठाकरेंनी सत्ताधारी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि मुख्य विरोधी पक्ष एमआयएम’वर केला होता.

त्यावेळी त्यांनी औरंगाबाद शहरातील गाजलेला कचरा प्रश्‍न सुद्धा उपस्थित केला. मागील २५ वर्षात तुमचे शहर आणि खासदार यातील काहीच बदलले नाही आणि त्यामुळे नागरिक म्हणून त्यांना तुमची भीतीच उरलेली नाही. हेच कारण आहे की,’कचरा प्रश्‍न तसाच रेंगाळत पडला आहे’. नाशिक शहरात मनसेने काही नसतांना खूप चांगल्या गोष्टी केल्या. औरंगाबादकडे तर जगप्रसिद्ध अजिंठा, वेरुळ लेण्या आहेत.याचा अर्थ जगभरातील विमानं तुमच्या शहरात उतरायला हवीत. या लेण्यांची योग्य काळजी आणि मार्केटिंग केले तर महाराष्ट्राला हजारो कोटीच उत्पन्न मिळेल असं राज ठाकरे म्हणाले होते.

‘राजकारण आणि मतदान हसण्यावारी घेऊ नका असे आवाहन मनसे अध्यक्षांनी त्यावेळी उपस्थितांना केले होते. छोट्या मोठ्या घटनांना घाबरू नका, एकदा मला संधी द्या, मग बघतो तुम्हाला कोण हात लावतो ते’, असा विश्वास व्यक्त करतानाच पुढच्या वेळी मी येईन तेव्हा औरंगाबाद शहराच्या विकासाचा आराखडा तुमच्या समोर ठेवीन असा शब्द त्यांनी उपस्थितांना दिला होता. पुढे सत्ताधाऱ्यांवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, सत्तेसाठी शिवसेना आणि एमआयएमचे साटेलोटे आहे. निवडणुकीपुरते ‘ते’ हैद्राबाद वरुन येतात, भीतीदायक वातावरण करतात, दोघांचाही लाभ करुन ५ वर्षासाठी निघून जातात.

विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने राजनीतीकार प्रशांत किशोर यांच्या I-PAC कंपनीच्या मार्फत ‘आदित्य संवाद’ हा उपक्रम राबवला होता. त्यावेळी औरंगाबाद’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्थानिक तरुणाने आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारताना मनसेने नाशिक’मध्ये जी विकास कामं करून दाखवली होती, तो मागील अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये शिवसेनेला का जमली नाहीत असे प्रश्न विचारात आदित्य ठाकरेंना घेतले होते. त्या तरुणाला उत्तर देताना देखील आदित्य ठाकरे यांची भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळालं होतं. यावरून स्थानिक लोकांना मनसेकडून आशा आहे, मात्र मनसेला दिल्लीतील ‘आप’ सरकार’प्रमाणे ते लोकांपर्यंत पोहोचवता यायला हवं असं तज्ज्ञांना आजही वाटतं. त्यामुळे हिंदुत्व आणि औरंगाबादचा विकास हेच मनसेचे प्रमुख मुद्दे असतील असा अंदाज व्यक्त केला जातं आहे.

 

Web Title: MNS Party will provide clean and safe city says Raj Thackeray to Aurangabad City citizens.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x