सामान्य लोकांना इस्पितळ व बेड्स'बाबतीत काहीच माहिती मिळत नाही - फडणवीस
मुंबई, १८ मे: देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरली आहे. मुंबईच्या धारावीत कोरोनाचा अक्षरश: कहर सुरू असून याठिकाणी दररोज ५० ते १०० नवीन रुग्ण आढळत आहेत. मागील २४ तासांत धारावीत कोरोनाचे ४४ नवे रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकट्या धारावीची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२०० च्या वर पोहोचली असून आतापर्यंत सुमारे ६० जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.
दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला आहे आणि त्यातून ग्रीनझोन सुद्धा कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. अगदी गेली दोन महिने कोरोनापासून दूर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. गडचिरोलीत तीन वेगवेगळया ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाइनमधील ३ लोकांचे नमुने हे पॉझिटिव्ह आले आहे.
देशात सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग हा सर्वाधिक महाराष्ट्रात होतं आहे. प्रत्येक शहर, जिल्हा त्यामुळे अडचणीत सापडला आहे. मुंबई, पुणे, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे या प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मात्र राज्यातील लोकांमध्ये सध्या गोंधळाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण राज्यभरातील कोरोना उपचार केंद्र आणि त्यातील उपलब्ध बेड्स याबद्दल लोकांना कोणतीही माहिती मिळत नाही.
विशेष म्हणजे सरकारकडे कोरोनासंदर्भात राज्यभरातील सर्व माहिती एकत्रित पणे दाखविण्यासाठी कोणतीही यंत्रणा अथवा तंत्रज्ञान नाही. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या डॅशबोर्डवर मुख्य गरजेची असणारी माहिती उपलब्ध करून देणारा डॅशबोर्डच नाही. जो आहे त्यात केवळ नवे रुग्ण, एकूण मृत्यू आणि बरे झालेले रुग्ण अशी माहिती आहे. मात्र गरजेची असणारी राज्यभरातील इस्पितळं,बेड्स, जिल्ह्यानिहाय टेस्ट लॅब आणि इतर महत्वाची माहिती उपलब्ध नसल्याने राज्यभरातील लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. त्यामुळेच फडणवीसांनी तशी मागणी करणारं ट्विट केलं आहे.
I am constantly getting calls from the relatives of patients in Mumbai telling me that how they are not getting admission in any of hospital and have to run from pillar to post.
I request the State Government to create a dashboard for bed availability and..— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 18, 2020
News English Summary: getting admission in any of hospital and have to run from pillar to post. I request the State Government to create a dashboard for bed availability News Latest Updates.
News English Title: Peoples of Maharashtra not getting details about Corona hospitals and beds details said Devendra Fadnavid News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News