मुंबई : काँग्रेसचे मुंबईतील नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांना ईडीने दणका दिला आहे. बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील जवळ जवळ ४६२ कोटीची संपत्ती ईडीने म्हणजे अंमलबजावणी संचालनालयाने ताब्यात घेतली आहे.

ईडीच्या माहितीनुसार बाबा सिद्दीकी यांच्या मालकीच्या पिरॅमिड डेव्हलपर्स कंपनीच्या नावे तब्बल ३३ फ्लॅट्स होते. बाबा सिद्दिकींवर ४०० कोटीच्या एसआरए योजनांच्या कागदपत्रांमध्ये फेराफार केल्याच्या आरोप असून त्यामध्ये त्यांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

ईडीने त्यांच्यावर पीएमएलए कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली असल्याचे स्पष्ट केलं आहे. बाबा सिद्दिकींवर वांद्रे रेक्लमेशनजवळ असलेल्या जमात ए जमुरिया झोपडपट्टी परिसरात आलिशान फ्लॅट बांधून हा घोटाळा केल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. स्थानिक कोर्टाच्या आदेशाने २०१४ मध्ये बाबा सिद्दिकींसोबत १५८ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले होते. पुढील तपासाअंती ही कारवाई करण्यात आली आहे.

SRA scam involving baba siddique ed