19 April 2024 6:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

काश्मीर खोऱ्यात २४ तासांत ९ दहशतवादी ठार, १ जवान शहीद

Jammu Kashmir, Terrorist Killed, Indian Army

जम्मू, ५ एप्रिल: भारतीय लष्कराने काश्मीरमधील विविध भागांमध्ये केलेल्या कारवाईत ९ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. दरम्यान, या कारवाईत एक जवान शहीद झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.एएनआयनं लष्कराच्या सुत्रांच्या हवाल्यानं याबाबत ट्विट केलं आहे.

मागील २४ तासांत भारतीय सैन्यानं ९ दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. दहशतवादी आणि सैन्यामध्ये झालेल्या चकमकीत १ जवान शहीद झाला आहे तर २ जणांची प्रकृती ही गंभीर आहे. अजूनही जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. अती बर्फवृष्टीमुळे आणि खराब हवामानामुळे सैन्याच्या कारवाईमध्ये अडचणी येत आहेत.

मागील काही दिवसांपासून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, याला भारतीय सुरक्षारक्षकांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये सुंदरबन परिसरात शुक्रवारी ( ३ एप्रिल ) सीमारेषेचं उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला होता. भारतीय सैन्याकडून या हल्ल्याला चौख प्रत्युत्तर देण्यात आलं. मात्र राजौरी येथील झालेल्या चकमकीत ६ जवान जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

News English Summary: The Indian army has been able to lay down 9 terrorists in various parts of Kashmir. Meanwhile, one jawan was martyred and two others were seriously injured in the operation. In the last 24 hours, Indian troops have laid down 9 terrorists. The clash between the militants and the army killed 1 soldier while the nature of the two was critical. The clashes between the militants and the militants are still ongoing, ANI news agency reported. Due to heavy snowfall and bad weather, military operations are facing difficulties.

News English Title: Story nine terrorists killed by Indian Army in last 24 hours in Jammu Kashmir valley News latest updates.

हॅशटॅग्स

#Indian Army(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x