7 May 2021 9:43 AM
अँप डाउनलोड

प. बंगाल निकालानंतर कंगना पिसाळली? | गुजरात दंगलीचं अप्रत्यक्ष उदाहरण देत मोदींना रुद्रावतार घेण्यासाठी ट्विट

Kangana Ranatu

कोलकत्ता, ०४ मे | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर तृणमूल काँग्रेसकडून हिंसाचार करण्यात आल्याचा आरोप होत आहे. ट्विटरला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि समर्थकांकडून पश्चिम बंगालमधील व्हिडीओ शेअर करत राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणीदेखील केली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु असून भाजपासहित इतर पक्षांनाही तृणमूल काँग्रेसवर आरोप केले आहेत. हिंसाचारात ११ जणांचा मृत्य झाला असून केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधी सविस्तर अहवाल मागवला आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाने करोनासंबंधित नियमांचं पालन करुन ५ मे रोजी देशव्यापी आंदोलन केलं जाईल असं जाहीर केलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

प्रियंका चतुर्वैदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या नियोजित आंदोलनावरुन ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. देशाने अजून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव पाहिलेला नाही, त्यामुळे भारतीय जनता पक्षानुसार अशा सुपर स्प्रेड धरणे कार्यक्रमांची गरज आहे. नाही का? असा टोला त्यांनी लगावला आहे.

दुसरीकडे समाज माध्यमांवर गरळ ओकण्यास सदैव तत्पर असणाऱ्या कंगना रानौतने पुन्हा धक्कादायक ट्विट करत धामिर्क तेढ वाढवायला सुरुवात केली आहे. त्यासाठी ती आता थेट अप्रत्यक्ष दंगलीच्या चिथावण्या देत आहे. यावेळी तर तिने हद्दच केली आहे. कंगनाने ट्विट करताना म्हटलं आहे की, “हे भीषण आहे, आपल्या गुंडी ला ठार मारण्यासाठी एक मोठी गुंडी हवी आहे, ती एक मुक्त दानव आहे. तिला वश करण्यासाठी मोदीजी कृपया तुमचं २००० पूर्वीच रुद्र रूप दाखवा असं म्हणत थेटगुजरात दंगलीच अप्रत्यक्ष उदाहरण दिलं आहे.

 

News English Summary: This is horrible, we need super gundai to kill gundai, she is like an unleashed monster, to tame her Modi ji please show your Virat roop from early 2000’s said Kangana Ranaut news updates.

News English Title: Kangana Ranatu reaction after West Bengal Assembly result news updates.

हॅशटॅग्स

#Entertainment(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x