24 April 2024 1:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | टाटा ग्रुपचा सर्वात स्वस्त शेअर तेजीत, 2 दिवसात दिला 14% परतावा, यापूर्वी 2926% परतावा दिला Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला Penny Stocks | 10 पेनी शेअर्स जे अवघ्या 1 रुपया ते 9 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, संयमातून श्रीमंत होऊ शकता IREDA Share Price | IREDA शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल? तज्ज्ञांनी जाहीर केला सपोर्ट लेव्हल आणि रेझिस्टन्स लेव्हल Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट आली, शेअर मोठ्या रॅलीसाठी सज्ज झाला, किती फायदा होईल? Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली IPO GMP | स्वस्त IPO शेअर आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 113 टक्के परतावा, GMP चा धुमाकूळ
x

‘माझा पक्ष रिजनल असला, तरी ओरिजनल आहे’; उद्धव ठाकरेंची मनसे अध्यक्षांवर अप्रत्यक्ष टीका

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्राला दिलेली उद्धव ठाकरेंची आज दुसरी मॅरेथॉन मुलाखत प्रसीद्ध झाली. यामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक फोडण्याच्या आरोपावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिल. मागील वर्षी मुंबई महानगरपालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ६ नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले. यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली होती. तसेच ही घटना मी कधीही विसरणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यावेळी राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली होती.

मॅरेथॉन मुलाखतीतील संजय राऊतांच्या या प्रश्नाला नेमकं काय उत्तर दिल उद्धव ठाकरे यांनी;

उद्धव ठाकरे म्हणाले की ,’माझी पार्टी शिवसेनाप्रमुखांनी दुसऱ्याचा पक्ष फोडून स्थापन केलेली नाही. ती शिवसेना म्हणूनच स्थापन झाली आणि शिवसेना म्हणूनच आहे आणि ती शिवसेना म्हणूनच राहील. तिने तिचं कधीही नाव, नेता किंवा निशाण बदललं नाही आणि दुसरा पक्ष फोडून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन नाही केला. मुळामध्ये जो पक्ष माझा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करूनच स्थापन झाला होता तो पक्ष फुटला म्हणजे नेमकं काय झालं? माझं म्हणणं हेच आहे की मुळातच माझं जे तुम्ही घेऊन गेला होतात ते माझ्याकडे परत आलं असेल तर मी कुठे काय फोडलं? विचार तोच, माणसं तीच, नवीन काय केलंत? निर्माण काय केलंत?’.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x