तुम्ही व तुमच्या पुढच्या पिढ्या वांद्रयातच राहणार हा माझा शब्द: राज ठाकरे

मुंबई : मुंबईमधील मराठी माणसाचं अस्तित्वच धोक्यात आल्याचं अधोरेखित करत, सरकार येथील जमिनी इंच इंच विकू याच उद्देशाने धोरण राबवत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. मुंबईमधील वांद्रा येथील शासकीय वसाहतीला भेट देऊन त्यांनी इथल्या समस्या समजून घेतल्या तसेच नंतर स्थानिकांना संबोधित सुद्धा केले.
पुनर्विकासाच्या नावाने वांद्रा येथील शासकीय वसाहतीमधील लोकांना विस्थापित करण्याचा घाट घातला जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. सरकारच्या एकूणच हालचाली या मुंबईमधून मराठी माणसाचं अस्तित्वच संपविण्यासाठी आहेत असा थेट आरोप सुद्धा राज ठाकरे यांनी केला. पुनर्विकासाच्या नावाखाली इथल्या स्थानिक लोकांना घरं खाली करायला सांगितली जात आहेत. परंतु इथल्या नागरिकांचा त्याला ठाम विरोध आहे. त्याच लोकांना धीर देण्यासाठी आणि आश्वस्त करण्यासाठी राज ठाकरे यांनी या वसाहतीला भेट दिली.
इथल्या स्थानिक मराठी माणसाला बाहेर हुसकावून नंतर तिथे परप्रांतियांना वसवण्याचा शिष्ठबद्ध प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी लोकांना सूचित केलं आहे. कोणतीही सरकार आलं तरी सामान्य मराठी माणसाच्या संबंधित धोरणात काही बदल होत नाहीत असं सुद्धा राज ठाकरे म्हणाले. परंतु वांद्रे शासकीय वसाहतीतील लोकांना वचन देताना राज ठाकरे म्हणाले की, ‘तुम्ही व तुमच्या पुढच्या पिढ्या वांद्रयातच राहणार हा माझा शब्द आहे’ त्यामुळे स्थानिकांमध्ये एक आशा जागी झाल्याच चित्र पाहायला मिळालं.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
हर घर महंगाई | ज्या महागाई - बेरोजगारीच्या मुद्द्यामुळे मोदी सरकार सत्तेत, तेच मुद्दे 2024 भाजपाला भोवणार?
-
Viral Video | त्याचा वेगाने येणाऱ्या कारच्या धडकेने मोठा अपघात होतो, नंतर जे घडलं ते पाहून डोळ्यावर विश्वास बसणार नाही
-
5G Spectrum Auction Scam | 5G स्पेक्ट्रम लिलावात महाकाय घोटाळा झाला?, दाक्षिणात्य नेते आक्रमक, वरिष्ठ पत्रकारांचं ट्विट
-
शिंदे-फडणवीस सरकारच्या 'मायक्रो कॅबिनेट' मंत्रिमंडळाचा जम्बो निर्णय | सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी प्रभाग रचनांबाबत घाईत निर्णय?
-
Amazon Great Freedom Festival 2022 | अॅमेझॉनने ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये अनेक स्मार्टफोन, गॅझेट्स अत्यंत स्वस्त
-
Mutual Funds | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना 15x15x15 या सूत्राचा वापर करा, तुम्हाला करोडोचा परतावा मिळेल
-
RBI Monetary Policy | आरबीआयने रेपो रेट वाढवला, महागाई जगणं अवघड करणार, सर्व प्रकारच्या कर्जाचे EMI वाढणार
-
Viral Video | भाजपशासित राज्यात नरक यातना, अँब्युलन्स नाकारल्याने मृत आईचं शव बाईकवर बांधून मुलाचा 80 किमी प्रवास
-
Viral Video | हा श्वान व्हॉलीबॉल खेळण्यात किती तरबेज आहे पहा, खतरनाक टाईमिंगचा व्हायरल व्हिडिओ पहा
-
Credit Score | क्रेडिट स्कोअर संबंधित तुमच्या तक्रारींचं निरसन आरबीआय करणार, जाणून घ्या कसं