12 December 2024 3:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे
x

आगामी लोकसभा निवडणुकीत पराभवाचे सर्व्हे येताच, भाजपच्या अमराठी नेत्यांचं विरोधी पक्षातील नेत्यांविरोधात धमक्यांचं तांडव सुरू

Mohit Kamboj

Mohit Kamboj | राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बडा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यासोबत दिसणार या आशयाचं ट्विट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलं आहे. एवढंच नाही तर सेव्ह धिस ट्विट असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मोहित कंबोज यांचा इशारा नेमका कुणाकडे आहे याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. राजकीय वर्तुळात या ट्विटची चर्चा सुरू झाली आहे.

अनिल देशमुख यांना ईडीने १ नोव्हेंबरला रात्री उशिरा अटक केली आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक यांनीही फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली आहे. हे दोघेही सध्या तुरुंगात आहेत. अशात भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केलेलं ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे. आता राष्ट्रवादीच्या कोणत्या बड्या नेत्याचा नंबर या दोघांसोबत लागणार याची चर्चा रंगली आहे.

मोहित कंबोज यांचं ट्विट :
Save This Tweet राष्ट्रवादीचा एक एकदम बडा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटणार या आशयाचं ट्विट मोहित कंबोज यांनी अगदी थोड्या वेळापूर्वी केलं आहे. आता हा बडा नेता नेमका कोण? हे पाहणं महत्त्वाचं आहे. मोहित कंबोज हे नेमका कुणाकडे इशारा करत आहेत? याचीही चर्चा ट्विटरवर रंगली आहे.

लोकसभेच्या ४८ जागांपैकी ३० जागा युपीएला मिळतील :
आज लोकसभा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रातल्या ज्या लोकसभेच्या ४८ जागा आहेत त्यापैकी ३० जागा युपीएला मिळतील म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळतील. असं इंडिया टुडे आणि सी व्होटर्सच्या सर्व्हेमध्ये लोकांचं म्हणणं आहे. तसंच १८ जागा या एनडीएला म्हणजेच भाजपला आणि त्यांच्या मित्र पक्षांना मिळतील असं लोकांना वाटतं आहे. असं घडलं तर हे चित्र भाजपसाठी धक्कादायक आहे यात शंकाच नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचंड प्रभाव २०१४ मध्ये दिसून आला होता. तसंच २०१९ मध्येही तो कायम राहिला. एनडीएचे जास्त खासदार या दोन्ही वर्षांमध्ये निवडून आले. मात्र आत्ता जे सत्तानाट्य महाराष्ट्रात घडलं आहे त्यानंतर जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर हे चित्र भाजपसाठी धक्कादायक ठरेल असं लोकांचं म्हणणं आहे. तसेच प्रचंड महागाई आणि बेरोजगारीवरून मतदारांच्या मनात मोदी सरकार विरोधात प्रचंड संताप देखील आहे.

शिंदे गटाला आणि भाजपला मोठा धक्का बसणार :
एकंदरीत सर्व्हेचा फटका बसेल तर तो शिंदे गटाला आणि भाजपला आहे. हा अत्यंत धक्कादायक सर्व्हे आहे असंच समोर येतं आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आले आहेत. त्याच काळात घेतलेला हा सर्व्हे आहे. भाजप आणि शिवसेना यांच्याकडे ४२ जागा होत्या. आता भाजपकडे ४८ पैकी ३७ जागांचं बळ आहे. मात्र याचं नुकसान होऊन त्या १८ वर येऊ शकतं असं लोकांना वाटतं आहे. त्यामुळे आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजपला मोठा फटका बसू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mohit Kamboj tweet on NCP leader check details 17 August 2022.

हॅशटॅग्स

#Mohit Kamboj(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x