17 November 2019 9:52 PM
अँप डाउनलोड

रस्त्यांवरील खड्डे; मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भ्रष्ट सत्ताधारी व अधिकारी किती निष्पापांचे प्राण घेणार?

काल ज्या घटनास्थळी आरव’चा रस्त्यांवरील खड्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला, त्या ठिकाणी त्याच्या बाबांनी आरवला आवडणारा दही-भात रस्त्यावर ठेवला आणि उपस्थितांचे डोळे पाणावले. अनेकांना ते दृश्य पासून रडू कोसळले. पालिकेतील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमुळे आणि सत्ताधार्यांमुळे अजून किती निरपराध लोक आपल्या प्रियजनांना गमावणार आहेत असा प्रश्न विचारला जात आहे.

आमच्या कुटुंबावर ओढवलेली परिस्थिती इतर कोणावर ही ओढावू नये म्ह्णून आरव’च्या वडिलांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सुस्त प्रशासनाला पत्र लिहिलं आहे. मात्र पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना आणि सत्ताधाऱ्यांना कसले ही सुख दुःख नसल्याचे चित्र आहे. आराव’च्या अपघातानंतर सुद्धा एक महिला तिच्या पतीसोबत दुचाकीवरून प्रवास करतेवेळी रस्त्यावरील खड्यामुळे त्या महिलेचा तोल गेला आणि बाजूने जाणाऱ्या बसखाली त्या चिरडल्या गेल्या होत्या.

मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीच्या रस्त्यांवर पावसाचं तुंबलेलं पाणी आणि त्यामुळे न दिसलेले खड्डे यांच्यामुळे अनेक निरपराध लोक त्यांचा जीव गमावत आहेत. कल्याण येथील शिवाजी चौक व सहजानंद चौक दरम्यान असलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीवर मागे बसलेला आरव खाली पडला. परंतु दुर्दैवाने तो बाजूने जाणाऱ्या ट्रकच्या खाली चिरडला गेला होता. एकूणच मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली महापालिकेतील भ्रष्ट सत्ताधारी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या दळिद्री युत्या अजून किती निरपराधांचे प्राण घेणार आहेत ते समजण्या पलीकडचं आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(741)BJP(415)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या