पक्ष बैठकीला मिताली ठाकरेंची उपस्थिती | वरुण सरदेसाई म्हणाले शॅडोचे पण माझे कुटुंब, माझी जबाबदारी
मुंबई, २९ जानेवारी: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका वर्षभरावर आल्या आहेत आणि त्यानुषंगाने सत्ताधारी शिवसेनेला विरोधकांनी घेरण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील कोविड सेंटरच्या उभारणीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यापूर्वीच मनसे आणि भाजपने केला आहे.
यामध्ये मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील याच मुद्याला अनुसरून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील लक्ष केल्याचं पाहायला मिळालं आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी अप्रत्यक्ष ट्विट करताना म्हटलं आहे कि, “विरप्पनने जेव्हढं लोकांना लुटलं नसेल त्या पेक्षा जास्त सत्ताधार्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल.
यानंतर युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई देखील संतापल्याच पाहायला मिळत आहेत आणि त्यांनी एकावर एक ट्विट करत मनसेला लक्ष केलं आहे. त्यांनी ट्विट करताना खंडणी प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांना झालेल्या अटकेचे गुगलवरून जुने दाखले दिले आणि मनसेला डिवचल्याच पाहायला मिळत आहे. यासंदर्भात त्यांनी दोन ट्विट केले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेची आज दुसऱ्यांदा महत्वपूर्ण बैठक होत आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला राज्यातील मनसेचे सर्व बडे नेते उपस्थित आहेत. वांद्रे इथल्या MIG क्लबमध्ये होणाऱ्या या बैठकीला राज ठाकरे यांच्यासह त्यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे हे सपत्नीक उपस्थित आहेत. यापूर्वी देखील मिताली यांनी पक्षीय कार्यक्रम किंवा बैठकांना उपस्थिती लावली आहे. अगदी शर्मिला ठाकरे देखील ते करतात, मात्र त्याचा थेट अर्थ त्यांचा पक्ष पातळीवरील कामात हस्तक्षेप असतो असा अर्थ होतं नाही. मात्र सदर वृत्त पसरताच युवासेना सचिव वरुण सरदेसाईंनी यावर लगेचच ट्विट केलं आहे.
मनसेने देखील ‘माझं कुटुंब माझी जवाबदारी’ या ठाकरे सरकारच्या कोरोना काळातील टॅगलाईनची अनेकदा खिल्ली उडवली आहे. त्यालाच अनुसरून वरूण देसाई यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “‘शॅडो’ चे पण ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी”
News English Summary: Maharashtra Navnirman Sena (MNS) is holding its second important meeting today. All the senior MNS leaders in the state are present at the meeting which will be held in the presence of party president Raj Thackeray. Raj Thackeray, his son and MNS leader Amit Thackeray’s wife are present at the meeting which will be held at MIG Club in Bandra. Even before this, Mithali has attended party events or meetings. Even Sharmila Thackeray does it, but that doesn’t mean she is interfering in party work. However, as soon as the news spread, Yuvasena Secretary Varun Sardesai tweeted about it.
News English Title: Yuvasena secretary target MNS over presence on Mitali Borude during party meeting news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News