12 October 2024 5:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest | 5 वर्षांसाठी केलेली FD 1 वर्षातच तोडायची असल्यास व्याज मिळेल की उलट पैसे कापले जातील No Cost EMI | नो कॉस्ट EMI खरंच फायद्याचा असतो, खरंच फ्री सुविधा मिळते का, असा असतो खेळ - Marathi News Nippon India Small Cap Fund | बापरे, महिना रु.10,000 SIP करा, ही योजना 1 कोटी 53 लाख रुपये परतावा देईल - Marathi News TCS Share Price | टाटा ग्रुपचा IT शेअर देणार मोठा परतावा, TCS स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TCS Manmauji Movie Release Date | एका तरुणासाठी स्त्रियांना झालंय प्रेमाचं लागीर, 'मनमौजी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर IREDA Share Price | PSU IREDA शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | डिफेंस क्षेत्रातील शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

'माजी' झाल्याने आता कोणी इंडियन आयडॉलला उभं पण करणार नाही: वरूण सरदेसाई

Shivsena Yuva Leader Varun Sardesai, Amruta Fadnavis

नागपूर: ‘माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही’ असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यासाठी फडणवीसांनी, ‘केवळ गांधी आडनाव असून चालत नाही. त्यांच्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात’, अशी टीका ट्विटरद्वारे केली होती.

आज देवेंद्र फडणवीस यांच्या राहुल गांधी यांच्या आडनावावरील टीकेवर त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी होय देवेंद्र हे खरे आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण सोडला आहे. फक्त ‘ठाकरे’ आडनाव असून सुद्धा कोणी ‘ठाकरे’ होऊ शकत नाही. फक्त आपलं कुटुंब आणि सत्ता या पलिकडे जाऊन लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करावं लागतं अशी थेट टीकाच त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलीय. महत्वाचे म्हणजे त्यांनी फडणवीस यांना दिलेल्या उत्तरात उद्धव ठाकरे, शिवसेना यांचे अधिकृत ट्विटर हँडलही टॅग केले आहे. या त्यांच्या विधानावरून वाद होण्याची चिन्हे आहेत. या ट्विटवरून अमृता या ट्रोलही होऊ लागल्या आहेत.

दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या बोचऱ्या टीकेला शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. ‘सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादा पेशवेंची बुद्धी भ्रष्ट केली’, अशा शब्दांमध्ये अमेय घोले यांनी अमृता फडणवीसांना घणाघाणी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की,’इतिहासात रघुनाथदादा पेशवे हे बुद्धिमान, पराक्रमी असल्याचे सुरुवातीचे उल्लेख आहेत. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो!’ एवढंच नाही तर अमृता फडणवीस यांच्यासाठी #आजच्याआनंदीबाई असा हॅशटॅग देखील वापरला आहे.

आता शिवसेनेचे युवा नेता वरूण सरदेसाईंनी यांनी बोचरी टीका केली आहे. अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ ट्वीटला वरूण सरदेसाईने प्रत्युत्तर दिलं आहे. कालपासून हे ट्वीट नाट्य सुरू आहे. शिवसेनेचे युवा नेता वरूण सरदेसाईंनी अमृता फडणवीसांच्या ट्विटला रिट्वीट करून ‘मराठी बिग बॉसचे ऑडिशन कुठे सुरू आहेत का? विचारले आहे. तसेच माजी झाल्यामुळे आता कोणी इंडियन आयडॉल सारख्या गाण्याच्या कार्यक्रमालाही बोलवणार नसल्याचं म्हटलं आहे. बाकी बिग बॉससाठी चालू देत जोरदार…’ अशी बोचरी टीका केली आहे.

 

Web Title :  Shivsena Yuva Leader Varun Sardesai slams Amruta Fadnavis over twit CM Uddhav Thackeray.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x