3 August 2020 2:47 PM
अँप डाउनलोड

अनधिकृत होर्डिंग कोसळून पुण्यात दोघांचा मृत्यू तर ८ जखमी

पुणे : रेल्वेच्या जागेवरील अनधिकृतपणे होर्डिंग्ज काढत असताना एक मोठे लोखंडी होर्डिंग दुपारी कोसळले आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला असून तब्बल ८ जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडल्याचे वृत्त आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पुण्यातील जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकात ही घटना घडली आहे. दरम्यान, खाली असलेल्या अनेक वाहनांच सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संबंधित जखमींना ताबडतोब इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दल तसेच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. या घटनेत अनेक रिक्षांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. मुख्य म्हणजे मृत्यू झालेल्या दोघांमध्ये रिक्षाचालक आणि दुचाकीस्वाराचा समावेश आहे.

या घटनेमुळे शाहीर अमर शेख चौकातील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती. अखेर चौकाकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याने या मार्गावरील वाहतूक दुसरीकडून वर्ग करण्यात आली आहे. कोसळलेले लोखंडी होर्डिंग हे रेल्वे प्रशासनाच्या मालकीचे असल्याचे समजते तसेच पुणे महापालिकेने हे होर्डिंग काढण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला अधिकुत पत्र पाठवले होते असं वृत्त आहे. कारण होर्डिंग लावताना त्यात नियमांचे उल्लंघन केल्याच सांगण्यात आलं होत. मात्र, रेल्वे प्रशासनाने पुणे महापालिकेच्या पत्रांची दखलच घेतली नाही, असा आरोप महापालिका अधिकारी आता करू लागले आहेत.

घटनेचा व्हिडिओ;

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x