25 April 2024 4:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा
x

पुण्यात तळीराम सर्वात आधी सावध होते; बोर्ड वाचूनच आपत्कालीन स्टॉक करून ठेवला

liquor shop, Pune, Pimpari Chinchwad

पुणे, १८ मार्च:  कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील मद्यविक्रीची दुकाने ३० मार्चपर्यंत बद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तारांकित हॉटेल्सना यातून वगळण्यात आले असून १८ मार्चपासून या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. कायद्याचे उल्लंघन करुन मद्य विक्री करताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

मात्र असं असलं तरी मागील काही दिवसांआधीच पुण्यातील मद्यविक्रेत्यांनी या संभावित परिस्थितीचा अंदाज घेऊन दुकानांवर ड्रायडेची भीती दाखवणारे बोर्ड लावले होते. त्यामुळे सतर्क झालेल्या तळीरामांनी कोणताही धोका न पत्करता मोठ्या प्रमाणावर स्टॉक करण्यास सुरुवात केली होती. अनेकांनी मोठ्या प्रमाणावर आवडीचे ब्रँड ग्रुपने खरेदी करून घरगुती पार्टीचे देखील बेत बनवल्याचे त्या धावपळीत पाहायला मिळालं. एकूण तळीराम याबाबतीत सतर्क असल्याचं पाहायला मिळालं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाणे किंवा वास्तव्य करणे टाळण्याची आवश्यकता असून विषाणूची लागण एका संक्रमित व्यक्तीकडून अन्य व्यक्तीस होण्याची शक्यता विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी एका परिपत्रकाच्या माध्यमातून यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. जारी करण्यात आलेल्या परिपत्रकातील माहितीनुसार, महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ मधील १४२ अन्वये मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करुन मद्य विक्री केल्यास महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियमन १९४९ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा उल्लेख परिपत्रकाध्ये करण्यात आला आहे.

 

News English Summery: District Collectors have ordered that liquor shops in Pune and Pimpri Chinchwad Municipal Corporations be banned till March 30 following the outbreak of the Corona virus. Starred hotels have been excluded and the rules will go into effect from March 18. District collectors have warned that if found violating the law, selling liquor will be punished. District Correspondents have taken this decision considering the possibility that the virus could be transmitted from one infected person to another, due to Corona’s need to avoid crowding or living in crowded places. District Collector Naval Kishore Ram has issued a circular order in this regard. According to the circular issued, 142 of the Maharashtra Drunkenness Act 1949 have been ordered to stop the sale of alcohol. According to the circular, strict action will be taken under the Maharashtra Alcohol Prohibition Act, 1949, for the sale of alcohol in violation of the order.

 

News English Title: Story Covid19 Corona virus Pune collector orders to close liquor shop at Pune and Pimpari Chinchwad cities till 31st March News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Pune(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x