मुंबई : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपाला आलेल्या अपयशावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सामनातून टीका बोचरी टीका केली आहे. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नम्रपणाची स्तुती करताना मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.

दरम्यान, ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झालेला पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच पराभव असल्याची बोचरी टीका सामनातून करण्यात आली आहे. जर नरेंद्र मोदी हे प्रचारात उतरले नसते तर हा पराभव स्थानिक नेतृत्वाचा आणि अंतर्गत तिकीट घोटाळ्याचा ठरला असता. परंतु, पंतप्रधान पक्षातील सर्व फौजफाटा घेऊन निवडणुकीच्या प्रचारात उतरले होते.

तसेच त्याच्यासोबत भाजपचे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ सुद्धा प्रचाराच्या रिंगणात उतरवले होते. त्यामुळे हा पराभव केवळ पंतप्रधानांचाच आहे, अशी खरमरीत टीका करण्यात आली आहे. सदर टीका आजच्या, ‘गांधी का टिकले?; महाभारत’ या आजच्या सामनातील संपादकीयमधून करण्यात आली आहे. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नम्र स्वभावाचे कौतुक करताना, ‘मोदी तर पंडित नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधींचे देश उभारणीतील योगदान मानायला सुद्धा तयार नाहीत असा प्रश्न उपस्थित केला आहे.

दरम्यान, ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने संपूर्ण जवाबदारी संबंधित राज्यातील भाजपचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांवर ढकलून मोदींची कातडी वाचविण्याचे केविलवाणे प्रयत्न केल्याचे दिसते आहे. त्याला अनुसरूनच सामनातून ही टीका करण्यात आली असावी असं प्रथम दर्शनी वाटते आहे.

shivsena chief udhav thackeray criticised modi in saamana news paper after assembly election result