11 July 2020 1:23 PM
अँप डाउनलोड

जुमलेबाज मोदी हटाओ, योगी लाओ : लखनौमध्ये पोस्टर

लखनौ : ५ राज्यांमध्ये दारुण पराभव झाल्याने सध्या नरेंद्र मोदींच्या नैतृत्वाला विरोध होण्यास सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर लखनौमध्ये युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान बनवा अशी पोस्टरबाजी सुरु झाली आहे. उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना नावाच्या एका हिंदुत्ववादी संघटनेने युपीच्या राजधानीत हे पोस्टर लावल्याचे समजते.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

हिंदुत्वाचा ब्रँड योगींना आणा आणि देश वाचवा, असा संदेश पोस्टरबाजीतून देण्यात आला आहे. दरम्यान, या संघटनेने २०१९च्या १० फेब्रुवारीला लखनौमध्ये एका विराट धर्म संसदेचे आयोजन केले आहे आणि त्याआधीच वातावरण निर्मितीसाठी ही पोस्टरबाजी सुरु केली आहे. विशेष म्हणजे #Yogi4PM हा हॅशटॅग वापरण्यात आला आहे. तसेच या पोस्टरमध्ये ‘जुमलेबाज का नाम मोदी’ अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली आहे. या संघटनेने हिंदुत्वाच्या मुद्यावरुन योगी आदित्यनाथांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे तर मोदींना जुमलेबाज म्हटले आहे.

तसेच योगींना आगामी निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले नाही तर हिंदू भारतीय जनता पक्षाला मतदान करणार नाही, असा ठराव धर्म परिषदेत करण्यात येईल असे अमित जानीने यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन हिंदीभाषिक राज्यात योगी आदित्यनाथ यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर भर देऊन जोरदार प्रचार केला. तर मध्य प्रदेशातील एका सभेत योगींनी अली आणि बजरंग बली यापैकी एकाची निवड करा असे धक्कादायक विधान करत मतदारांना थेट आव्हान केले होते.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1245)#Yogi Sarkar(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x