18 April 2024 11:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Withdrawal Online | नोकरदारांसाठी खुशखबर! EPFO ने पैसे काढण्याचे नियम बदलले, आता दुप्पट पैसे काढू शकता Nippon India Mutual Fund | पगारदारांनो! या म्युच्युअल फंड योजना 46 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, येथे पैसा वाढवा SBI Special Scheme | टेन्शन नको! सरकारी SBI बँकेची ही योजना दरमहा पैसे देईल, इतर फायदे सुद्धा मिळतील Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 18 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 4 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 33 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Tinna Rubber Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! 3 वर्षात 1 लाख रुपयाच्या गुंवतवणुकीवर दिला 4.42 कोटी परतावा
x

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कीर्ती CBI च्या अटकेत.

चेन्नई : आयएनएक्स मीडिया प्रकरणी आर्थिक व्यवहार प्रकरणी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कीर्ती यांना आज सीबीआयने चेन्नई विमानतळावरच अटक केली.

कीर्ती यांनी आयएनएक्स मीडिया प्रकरणी संशयास्पद आर्थिक व्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप असून त्यांच्यावर गेल्यावर्षी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यूपीए सरकारच्या काळात २००७ मध्ये कीर्ती यांचे वडील म्हणजे पी. चिंदंबरम हे अर्थमंत्री असताना आयएनएक्स मीडियामध्ये ३०० कोटीची परकीय गुंतवणूक करताना त्यासाठी लागणाऱ्या परवानगी घेताना गैरव्यवहार झाल्याचा कीर्ती यांच्यावर आरोप आहे.

कीर्ती काही दिवस लंडनला होते, आज ते भारतात परतले आणि त्यांना चेन्नई विमानतळावरच सीबीआयने अटक केली असून त्याची विमानतळावरच चौकशी करण्यात आली आणि पुढील तपास करण्यासाठी त्यांना दिल्लीला नेलं जाणारा असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी प्रसारमाध्यमांना कळवले.

हॅशटॅग्स

#Kirti Chidambaram(1)#P Chidambaram(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x