19 April 2024 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर
x

पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची तातडीची मदत जाहीर | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Flood

मुंबई, ०३ ऑगस्ट | नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानी बाबत सादरीकरण केले. त्यानंतर मंत्रिमंडळात यास मान्यता देण्यात आली आहे.

घर पडलेलं असल्यास दीड लाख:
पुरामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक कुटुंबाला सानुग्रह अनुदान म्हणून 10 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यता आला आहे. दुकानदारांना 50 हजार आणि टपरीसाठी 10 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्ण घर पडलं असेल तर 1 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

महत्त्वाचे निर्णय:
* पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी 10 हजार रुपये देणार
* पूर्ण घर पडलं असेल तर दीड लाखाची मदत
* अर्ध घर पडलं असेल तर 50 हजाराची मदत
* दुकानदारांना 50 हजाराची मदत देणार
* टपरीधारकांना 10 हजार रुपये देणार
* उद्यापासूनच मदत देण्यास सुरुवात होणार
* कोकण, पश्चिम महाराष्ट्र, नांदेड, परभणीसह संपूर्ण राज्यातील पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटींचं पॅकेज जाहीर
* एनडीआरएफच्या निकषापेक्षा अधिक मदत
* 4 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान
* 4 हजार 500 जनावरांच्या मृत्यूची नुकसान भरपाई देणार
* जनावरांच्या मृत्यूंची 7 कोटींची भरपाई देणार
* 3 दिवसात पंचनामे पूर्ण होणार

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Maharashtra cabinet approves 11500 crore package for flood affected districts in Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x