25 April 2024 8:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

पारनेरचे ते ५ शिवसेना नगरसेवक भाजपमध्ये जाणार होते - अजित पवार

Deputy Chief Minister Ajit Pawar, Parner Five Shivsena Corporator, NCP

मुंबई, ९ जुलै : पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांची घरवापसी झाली आहे. 4 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पाचही नगरसेवक शिवसेनेत परतले आहेत. पाचही नगरसेवकांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. याआधी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह या पाचही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत 20 मिनिटं चर्चा केली होती.

शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांनी अवघ्या चार दिवसांत घरवापसी केली आणि सात दिवसाच्या महानाट्यावर अखेर पडदा पडला. पाचही नगरसेवकांनी ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुन्हा शिवबंधन बांधलं. तत्पूर्वी सर्व नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची भेट घेतली. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी मंत्रालयात ही भेट घडवून आणली. अजीत पवार, पाच नगरसेवक, हसन मुश्रीफ यांच्यात अर्ध्या तास चर्चा झाली. नंतर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे सर्व नगरसेवकांना मातोश्रीवर घेऊन आले होते.

दरम्यान आजच्या सारथीच्या बैठकीनंतर अजित पवारांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत याविषयावर भाष्य केलं. यावेळी त्यांना पाच नगरसेवकांच्या प्रवेशासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “मी त्या दिवशी बारामतीत होतो. त्या दिवशी गर्दीत होतो. मी सगळ्यांना सांगत होतो की, काळजी घ्या. त्या गर्दीत काही वाहनं आली. तिथे नीलेश लंके तिथे आले. मी त्यांना विचारलं की, काय काम आहे. त्यावर लंके मला म्हणाले की, काही अपक्ष नगरसेवक आहेत, त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आहे. मी बाहेर आलो, त्यांच्या गळ्यात रुमाल टाकले आणि त्यानंतर कार्यक्रम झाला. मग मला नंतर कळालं की, ते शिवसेनेचे होते. मग ती त्यांना विचारलं, तेव्हा ते म्हणाले की, दादा ते भाजपात जाणार होते. त्यांचं म्हणणं होतं की राष्ट्रवादीनं घेतलं नाही, तर भाजपात जाणार. आम्ही माणसांची फोडाफोडी करत नाही. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये. काल मी नीलेश लंके यांना बोलावून घेतलं. त्यांना सांगितलं.

 

News English Summary: Ajit Pawar commented on this in a press conference organized after the meeting. This time he was asked about the admission of five corporators. Speaking on the occasion, Ajit Pawar said they all were going to join BJP as informed by MLA Nilesh Lanke.

News English Title: Deputy Chief Minister Ajit Pawar Reaction on Parner Five Shivsena Corporator News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x