11 April 2021 6:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

राष्ट्रवादीच्या जीवावर मिळालेल्या खासदारकीचा राजीनामा द्या | मग राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा

NCP, Rupali Chakankar, MP Navneet Rana

मुंबई, २३ मार्च: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.दुसरीकडे अंबानी स्फोटक प्रकरणात API सचिन वाझे अटकेत आहेत.या सगळ्या प्रकरणांवरून काल लोकसभेत भाजपच्या खासदारांनी गोंधळ घातला. परंतू या सगळ्यात खासदार नवनीत राणा यांनी आक्रमक भूमिका घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे, अशी मागणी केली. त्यांच्या याच मागणीवरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी नवनीत राणांना चांगलेच सुनावले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संसदेत भाषण करताना ठाकरे सरकारवर सवाल उपस्थित केले. त्यानंतर अरविंद सावंत यांनी मला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली, असा आरोप राणा यांनी केला आहे. तू महाराष्ट्रात कशी फिरते, ते मी पाहतो, अशा शब्दांत सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोपदेखील त्यांनी केला. नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी उडी घेतली आहे. नवनीत राणा ताई आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे त्यांनी म्हटलंय. त्यानंतर, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी आणि नवनीत कौर यांना सल्ला दिलाय.

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ट्विट केले आहे की , नवनीतजी राणा आपल्याला जर नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा , कारण आज तुम्ही खासदार म्हणून जी भूमिका संसदेत मांडली आहे ती खासदारकी तुम्हाला राष्ट्रवादीच्या जीवावर मिळालेली आहे म्हणून मांडता आली आहे.

 

 

News English Summary: NCP Women’s State President Rupali Chakankar tweeted, “Navneetji Rana, if you are so obsessed with morality, first resign as an MP and then talk about the President’s rule in Maharashtra, because the role you have played as an MP in Parliament today is on the life of the NCP.” So it has been presented.

News English Title: NCP leader Rupali Chakankar criticised MP Navneet Rana News updates.

हॅशटॅग्स

#RupaliChakankar(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x