12 December 2024 3:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे
x

सुशांत प्रकरण | बिहार निवडणुकीसाठी मुंबई पोलिसांची बदनामी हा भाजपचा महाराष्ट्र द्रोह

Congress spokesperson, Sachin Sawant, Maharashtra BJP, Mumbai Police

मुंबई, 07 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या चौकशीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. “सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्याची पोलिसांनी चौकशी का केली नाही, माझ्या माहितीनुसार तिने आत्महत्या केली नाही, तर तिची देखील हत्या केली आहे. तिच्यावर बलात्कार करुन तिला मारण्यात आलं आहे. तिच्या गुप्तांगावर जखमा आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करायला हवा,” असे नारायण राणे म्हणाले होते. “सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीस कोणाला वाचवतंय,” असा प्रश्नही नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला होता.

“सुशांतच्या घराजवळ एक बंगला आहे. तिथे रोज काही मंत्री येतात. ते तिथे तीन तास काय करतात? 13 तारखेला ते तिथे जमले आणि तिथून सुशांतच्या घरी गेले होते. तिथे मंत्री गेले असतील तर कॅमेऱ्यात त्यांचा ताफा वगैरे ते येणार नाहीत. सगळ्यांना माहिती आहे कोण आहे ते, ज्याअर्थी जेवढा दबाव सरकार आणि पोलिसांवर येतोय, अधिकारी वाचवायचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना मी सांगू इच्छितो, हे होऊ शकणार नाही. विरोधी पक्ष सक्षम आहे. तो अशा गोष्टी होऊ देणार नाही,” असेही नारायण राणे म्हणाले होते. तसेच अतुल भातखळकर आणि इतर भाजपच्या नेत्यांनी देखील याच विषयावरून संशय व्यक्त केला होता.

दरम्यान, महाराष्ट्र भाजपाकडून झालेल्या टीकेला काँग्रेसनं उत्तर दिलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून भाजपावर निशाणा साधला. “बिहार निवडणूकीसाठी राजकारण करण्याकरिता बिहार पोलिसांचे गुणगान करुन मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र भाजपाच्या नेत्यांचा महाराष्ट्र द्रोह हा उठून दिसत आहे. ही मंडळी अत्यंत खालच्या पातळीवर उतरू शकतात. भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे,” असा हल्लाबोल सावंत यांनी केला.

 

News English Summary: Congress spokesperson Sachin Sawant tweeted and targeted the BJP. “The Maharashtra betrayal of the Maharashtra BJP leaders who are trying to discredit the Mumbai police by praising the Bihar police for politics for the Bihar elections is on the rise.

News English Title: Congress spokesperson Sachin Sawant slams To Maharashtra BJP On Planning For Mumbai Police News latest Updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x