15 December 2024 11:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

सुशांत प्रकरण | त्यांनी मला क्वारंटाईन नाही तर चौकशीच क्वारंटाईन केली

Sushant Singh Rajput Case, Bihar Police, Patna SP Vinay Tiwari, Quarantine

मुंबई, ७ ऑगस्ट : सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस अधिकारी पटण्यासाठी रवाना झाले आहेत. मला क्वारंटाईन केल्यामुळे चौकशीत अडथळा आल्याचा आरोप विनय तिवारी यांनी केला आहे. पटण्याला परतत असताना विनय तिवारी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

‘त्यांनी मला क्वारंटाईन केलं असं मी म्हणणार नाही, तर त्यांनी चौकशीच क्वारंटाईन केली. बिहार पोलिसांच्या चौकशीमध्ये अडथळे आणले गेले,’ असा आरोप विनय तिवारी यांनी केला आहे. कोणतीही यंत्रणा एकत्र काम करत असते. आपल्याला एकत्र काम करणं गरजेचं आहे असं सांगताना सीबीआय तपास करत असल्याने सुशांत सिंह प्रकरणावर आता भाष्य करणं योग्य ठरणार नाही असंही यावेळी ते म्हणाले.

दरम्यान सीबीआयने तपास हाती घेतल्यानंतर बिहारमधून आलेले पोलीस अधिकारी गुरुवारी पुन्हा राज्यात रवाना झाले. क्वारंटाइन असल्याने विनय तिवारी मुंबईतच होते. बिहारचे पोलीस महासंचालक (डीजीपी) गुप्तेश्वर पांडे यांनी विनय तिवारी यांना क्वारंटाइन करण्यावरुन टीका करताना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता.

त्यांना क्वारंटाईन केल्यानंतर पालिका आयुक्तांना बिहार पोलीस अधिकाऱ्यांनी पत्र लिहून विनय तिवारी यांची सुटका कारण्यासाठी विनंती केली होती. तसेच याबाबत कायदेशीर मार्गाने पुढचं पाऊल उचलू असं देखील त्यांनी म्हटलं होतं. सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस बिहार पोलिसांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने ही शिफारस मान्य करत सीबीआयकडे तपास देण्यास मान्यता दिली. यानंतर सीबीआयने सुद्धा तपास हाती घेत ६ ऑगस्ट २०२० रोजी एकूण सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

News English Summary: Bihar police officers who had come to Mumbai to investigate the death of Sushant Singh Rajput have left for Patna. Vinay Tiwari has alleged that quarantining me hampered the investigation.

News English Title: Sushant Singh Death Case Bihar Patna SP Vinay Tiwari Release From Quarantine News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x