13 December 2024 9:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Covid19 Vaccine | १२ ऑगस्टला जगातील पहिल्या लसीचं रशियात रजिस्ट्रेशन होणार

Russia, corona virus, Deputy Health Minister Oleg Gridnev, Covid19 vaccine

मॉस्को, ७ ऑगस्ट : जगभरात कोरोनाव्हायरसमुळे 7 लाखांपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत तर 80 लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. त्यामुळे कोरोनाची लस कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगभरात सध्या 165 कोरोना लशींवर काम सुरू आहे. त्यापैकी 26 लशींचं क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. तर सहा लशी क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत.

तिसऱ्या टप्प्यात व्यापक स्तरावर ट्रायल केलं जातं. मोठ्या संख्येनं लोक या ट्रायलमध्ये सहभागी होतात. लशीचा परिणाम किती आहे आणि किती लोकांवर ती काम करत आहे, याची माहिती या टप्प्यात मिळते. सहापैकी तीन लशी या चीनच्या आहेत. सिनोवॅक, वुहान इन्स्टिट्युट ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट आणि सिनोफॅरम/बीजिंग इन्स्टिट्युट ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट.

अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीच्या कोरोना लशीच्या पहिल्या दोन टप्प्याचे परिणाम चांगले आले आहेत. 27 जुलैपासून तिसरा टप्पा सुरू झाला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीकडे सर्वांचे डोळे लागून आहेत. या लशीचे वेगवेगळ्या देशात क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. भारतातील सीरम इन्स्टिट्युटही या लशीसंदर्भात भागीदार आहे. भारताच्या भारत बायोटेक आणि जायडस कॅडिला या कंपनीच्या कोरोना लशीचं ह्युमन ट्रायल सुरू झालेलं आहे. भारत बायोटेकने याआधी पोलिओ, रेबीज, चिकनगुनिया, जापानी इनसेफ्लाइटिस, रोटा व्हायरस आणि झिका व्हायरसवरील लसही तयार केली आहे.

यातच रशियातून एक अत्यंत आनंदाची बातमी आली आहे. बऱ्याच दिवसांपासून लोक ज्या कोरोना लसीची प्रतीक्षा करत होते, त्यांची ती प्रतीक्षा आता संपली आहे. हो, हे खरे आहे. आता रशिया 12 ऑगस्टला कोरोना व्हायरसवरील लसीचे रजिस्ट्रेशन करणार आहे. उप-आरोग्य मंत्री ओलेग ग्रिडनेव यांनी शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, रशिया कोरोनावरील आपल्या पहिल्या लसीचे 12 ऑगस्टला रजिस्ट्रेशन करणार आहे. ही लस, गामालेया रिसर्च इंस्टिट्यूट आणि रशियन संरक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे तयार केली आहे.

सध्या, ही लस अखेरच्या म्हणजेच तिसऱ्या टप्प्यात आहे. हे परीक्षण अत्यंत महत्वपूर्ण आहे. या लसीच्या सुरक्षितते बाबत आम्हाला काळजी घ्यावी लागेल. वैद्यकीय पेशाचा आणि वरिष्ठ नागरिक लसीकरण करून घेणारे पहिले व्यक्ती असतील. ग्रिडनेव यांनी उफा शहरात एका कॅन्सर केंद्राचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

 

News English Summary: Russia will register its first vaccine against the corona virus on August 12, Deputy Health Minister Oleg Gridnev said on Friday. The vaccine has been developed jointly by the Gamaleya Research Institute and the Russian Defence Ministry.

News English Title: Russia will register its first vaccine against the corona virus on August 12 said Deputy Health Minister Oleg Gridnev News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x