20 June 2021 9:19 PM
अँप डाउनलोड

पंतप्रधान ५ दिवसांच्या विदेश दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पासून ५ दिवसांच्या विदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत. पाच दिवसांच्या दौऱ्यात ते ब्रिटन आणि स्वीडनला भेट देऊन या देशांसोबत भारताचे संबंध आणखी दृढ केले जातील असं नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.

BhagyaVivah Marathi Matrimonial

स्वीडन दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यापार, प्रदुषणविरहित उर्जा, आणि गुंतवणूक या ३ प्रमुख विषयांवर स्वीडन सरकारशी चर्चा करतील आणि भारत – नॉर्डिक परिषदेला उपस्थित राहून तेथे परिषदेला संबोधित सुद्धा करतील.

स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोवेन यांची द्विपक्षीय चर्चा करून भारत आणि स्वीडनमधील संबंध वृद्धिंगत करण्यावर भर दिला जाईल. तसेच ब्रिटन दौऱ्यात भारत आणि फ्रान्सच्या संयुक्त पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा संघटनेत ब्रिटन सामील होणार असून, याच दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांची सुद्धा सदीच्छा भेट घेणार आहेत. तसेच गुरुवारी आणि शुक्रवारी लंडन मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1593)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x