18 January 2025 10:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
x

Viral Video | मी मोदींचा फॅन आहे हे सांगताना एलॉन मस्क का हसले असावेत हे फडणवीसांना समजलं का? त्यांची चीनबद्दलची स्तुती फडणवीसांनी ऐकावी

Viral Video

Viral Video | पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असून मंगळवारी (20 जून) त्यांनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार निर्माती कंपनी असलेल्या टेस्लाच्या भारतात येण्याबद्दलही चर्चा झाली.

बैठकीनंतर टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी भारतीय बाजारपेठेत टेस्लाच्या भारतात येण्याबद्दल मोठं विधान केलं. न्यूयॉर्कमधील पॅलेस हॉटेलमध्ये एलन मस्क यांनी सांगितले की, “कंपनी नजीकच्या काळात भारतात गुंतवणूक करणार आहे, जी भारताच्या विकासासाठी महत्त्वाची ठरेल.

एलन मस्क यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर भारतात गुंतवणूक करण्याच्या योजनेला दुजोरा देताना सांगितले की, मी स्वत: पुढच्या वर्षी भारत भेटीवर येण्याचा कार्यक्रम तयार करत आहे आणि टेस्लाही भारतात पाऊल ठेवेल असा विश्वास आहे.

न्यूयॉर्कमध्ये मोदी आणि एलन मस्क यांची भेट झाली. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना एलन मस्क यांना नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा एलन मस्क खळखळून हसले अन् म्हणाले, I am a fan of Modi! याचा व्हीडिओ भाजप नेत्यांकडून शेअर करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा व्हीडिओ शेअर केला आहे.

वास्तविक केवळ फडणवीस नव्हे तर देशातील सर्वच भाजप नेते हा व्हिडिओ शेअर करून आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींचं राजकीय मार्केटिंग करत आहेत. वास्तविक एलन मस्क हे अनुभवी आणि मुरलेले उद्योगपती आहेत. अनेक देशांमध्ये त्यांच्या कंपनीची गुंतवणूक आहे. अर्थात ज्या देशात गुंतवणूक केली जाते तेव्हा त्या देशातील सरकारचं कौतुक हे कोणत्याही गुंतवणूकदाराला करावंच लागतं. मात्र भाजप नेत्यांचा हा व्हिडिओ शेअर करण्यामागील हेतू पूर्णपणे राजकीय असला तरी एलॉन मस्क याचा हेतू हा एखाद्या अनुभवी गुंतवणूदाराप्रमाणे आहे आणि यात काही वावगं नाही. त्यांची प्रचंड गुंतवणूक चीन मध्ये आणि तिथे विस्तार योजना सुद्धा मोठी आहे.

त्यावेळी चीनची स्तुती करताना एलॉन मस्क काय म्हणाले होते
“केवळ मूकबधिर असलेल्या अंतर्गत कलह आणि चेहऱ्यावर मुक्का मारणे थांबवले पाहिजे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेपेक्षा दुप्पट किंवा शक्यतो तीन पट आकाराची अर्थव्यवस्था असलेला चीन आपण पाहणार आहोत असं म्हणत एलॉन मस्क यांनी यापूर्वी चीनची स्तुती केली होती. अर्थात ते जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत आणि त्यांच्या कंपनीची चीनमध्ये खूप मोठी गुंतवणूक असून पुढेही प्रचंड विस्तार करण्याच्या योजना आहेत.

हे ट्विट फडणवीसांनी शेअर केलं नाही?

News Title : Viral Video  of Elon Musk on China Development check details on 21 June 2023.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x