13 December 2024 3:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Health First | नारळाच्या तेलात मिसळा या तीन वस्तू | लांब-दाट केस मिळवा..

Mix hibiscus flower with coconut oil

मुंबई, २७ सप्टेंबर : नारळाचं तेल आपल्या केसांसाठी खूप चांगलं असतं, परंतु आपण आपल्या केसांच्या वाढीसाठी या खास गोष्टीसाठी नारळ तेलात मिसळून ह्याला अजून फायद्याचे बनवू शकतात. केसांच्या वाढीसाठी आपण नारळाच्या तेलात या तीन गोष्टी मिसळू शकता.

नारळाच्या तेलात मिसळा या तीन वस्तू, लांब-दाट केस मिळवा – Mix hibiscus flower with coconut oil for healthy hair Marathi :

प्रत्येक भारतीय कुटुंबाला असे वाटते की, नारळ तेल गुणांचा भंडार आहे आणि या मागे एक चांगले कारण असे आहे की नारळाचे तेल केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे आपल्या केसांच्या मुळात योग्य प्रकारे शिरतं आणि टाळू देखील निरोगी ठेवत.

आता विचार करा की आपण आपल्या आठवड्याच्या मालिशापूर्वी नारळाच्या तेलामध्ये केसांच्या वाढीसाठी कोणती नैसर्गिक सामग्री घालू शकता, जी आपल्या केसांसाठी एक योग्य मिश्रण असेल. असे केल्यानं आपले केस खराब होण्यापासून वाचू शकतात, तसेच हे सुनिश्चित केले जाऊ शकते की आपले केस नेहमीच निरोगी आणि बळकट असावे. निरोगी केसांच्या वाढीसाठी आपण नारळाच्या तेलात या तीन गोष्टी समाविष्ट करू शकतात.

1.  नारळाचं तेल आणि कढी पत्ता:
आपण स्वयंपाकघरात जा आणि मूठभर कढीपत्ता घ्या. स्वयंपाकघरातील ही सामान्य गोष्ट आपले केस वाढविण्यास मदत करू शकते. कढी पत्ता यात बीटा-कॅरोटीन आणि प्रथिनं मुबलक प्रमाणात असतात. जे केसांच्या वाढीस मदत करते.

यामधील असलेल्या पोषक घटकांमध्ये अँटी ऑक्सीडेन्ट आणि अमिनो ऍसिड केसांना पातळ होण्यापासून रोखतात आणि केसांचे मूळ घट्ट होण्यास मदत करतात. यामुळे केस गळतीच्या समस्येपासून सुटका मिळते.

आपल्याला एवढेच करावयाचे आहे की मूठभर कढीपत्ता घ्या आणि त्यांना काही दिवसांसाठी उन्हात वाळवून घ्या. आता या वाळक्या पानांना 100 मिली. नारळाच्या तेलात उकळवून घ्या. या तेलाला थंड होऊ द्या, गाळून बाटलीत भरून घ्या. आता या तेलाने मालीश करा.

Amazing Ways To Use Hibiscus For Hair :

2.  नारळाचं तेल आणि काळा बियाणे:
आपण नायजेला बियाणे याबद्दल ऐकलं असेल, जे व्हिटॅमिन ए, बी, आणि सी ने समृद्ध असल्याचे सांगतिले जातं. ते मॅग्नेशियम, झिंक, लोह, पोटॅशियम आणि आवश्यक फॅटी ऍसिड सारख्या पोषक घटकांनी समृद्ध असतात. आता हे शक्तिशाली घटकच आहे जे आपल्याला निरोगी केस देतात. जर का आपण केसांच्या गळण्या आणि तुटण्या सारख्या समस्यांशी झटत असाल, तर आपल्या केसांमध्ये नारळाचं तेल आणि कलौंजी च्या या गुणवर्धक अश्या या मिश्रणाला वापरून बघा.

या साठी सर्वप्रथम एक मोठा चमचा बियाणे दळून घ्या आणि नारळाच्या तेलाच्या बाटलीत मिसळा. वापर करण्याच्या दोन ते तीन दिवस असेच ठेवा. लावण्याचा पूर्वी तेल कोमट करून मगच डोक्याची मॉलिश करा.

3.  नारळाचं तेल आणि जास्वंदाचं फुलं:
जास्वंदाचं फुलं आपल्या केसांना अनेक पटीने फायदेशीर असतात. ते केवळ केसांच्या निरोगी वाढीस प्रेरणाच देत नसून केसांच्या गळतीला देखील रोखतात. आणि केसांना लवकर पांढरे होऊ देत नाही. व्हिटॅमिन ए आणि सी ने समृद्ध, जेव्हा आपण जास्वंदाच्या फुलांना नारळाच्या तेलासह मिसळता (hibiscus flower with coconut oil) तेव्हा हे तेल आपल्या केसांना कमकुवत होण्यापासून रोखत. जेणे करून केसांची गळती कमी होते.

मूठभर जास्वंदाची फुले घ्या, त्यांना थंड पाण्याने धुऊन घ्या आणि उन्हात वाळवून घ्या. एकदा कोरडे झाल्यावर नारळाचं तेल गरम करा आणि हळुवारपणे त्या फुलांच्या पाकळ्या या तेलात मिसळा (hibiscus flower with coconut oil). मंद आंचेवर मिश्रणाला गरम होऊ द्या. थंड करायला ठेवा. तेलाला बाटलीत काढून ठेवून द्या. आता एक दिवसाआड आपल्या टाळूला लावावं आणि किमान एक तास तरी केसांमध्ये तसेच ठेवा. नंतर केसांना धुऊन घ्या.

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mix hibiscus flower with coconut oil for healthy hair Marathi.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x