7 May 2021 8:48 AM
अँप डाउनलोड

लस घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज असल्याने विषाणूचा फार वाईट परिणाम होणार नाही - डॉ. गुलेरिया

AIIMS director Dr Randeep Guleria

नवी दिल्ली, १७ एप्रिल: देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर दिल्लीस्थित एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी मोठी माहिती दिलीय. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला अनेक घटक कारणीभूत आहेत, मात्र त्यातील दोन प्रमुख कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये लसीकरण सुरू झाल्यानंतर संसर्गाची प्रकरणे कमी होऊ लागली आणि लोकांनी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे थांबवले. याच काळात विषाणूमध्ये बदल झाला आणि कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कोरोनाच्या वाढत्या घटनांवर शक्य तितक्या लवकर नियंत्रण आणण्याची गरज आहे. ते म्हणाले की, सध्या देशात बरेच धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत आणि विधानसभा निवडणुकादेखील सुरू आहेत. त्यामुळे जीवन मौल्यवान असल्याचं आपल्याला समजून घ्यावे लागेल. आम्ही मर्यादीत कार्यक्षेत्रात इतर गोष्टी करू शकतो जेणेकरून लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत. लोकांनी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचेही पालन केले पाहिजे.

एएनआयशी बोलताना रणदीप गुलेरिया म्हणाले की, कोणतीही लस आपल्याला 100 टक्के संरक्षण देऊ शकत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ही लस घेतल्यानंतरही आपल्याला संसर्ग होण्याची शक्यता आहे, परंतु लस घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज असल्यामुळे विषाणूचा शरीरावर फार वाईट परिणाम होणार नाही आणि त्या व्यक्तीची स्थिती गंभीर होण्याची शक्यता नाही.

 

News English Summary: Speaking to ANI, Randeep Guleria said, “We should keep in mind that no vaccine can give us 100 per cent protection. You may still be infected after the vaccine, but having antibodies in the body after the vaccine will not have a very bad effect on the body and the person’s condition is not likely to be serious.

News English Title: Corona is spreading so fast in the country AIIMS director Dr Randeep Guleria news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1344)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x