14 December 2024 10:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Independence Day 2020 | पंतप्रधानांकडून Health ID Card ची घोषणा

Prime Minister Narendra Modi, National digital health mission, National Health ID card, For Indians

नवी दिल्ली, १५ ऑगस्ट : देशभरामध्ये ७४ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असला तरीही यावर्षी त्यावर कोरोनाचे सावट आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर सॅनिटायझेशन आणि इतर खबरदारी घेण्यात आली आहे. याशिवाय लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमात लहान मुलांऐवजी यंदा कोरोना वॉरियर्स सहभागी झाले आहेत. तसंच कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिनादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. दरम्यान या काळामध्ये लस कधी येणार असा सवाल वेळोवेळी उपस्थित केला जात आहे. यावर पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणातून उत्तर दिले.

“यावेळी करोना व्हायरसच्या लसीचे उत्पादन आणि वितरणाचा आराखडा ठरला आहे. कमीत कमी वेळेत करोनावरील लस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचा आराखडा तयार आहे” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. “भारतात करोना व्हायरसच्या लसी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. उत्पादन, वितरणाचा सर्व आराखडा ठरला आहे. प्रत्येक भारतीयाला ही लस मिळेल हे सरकार सुनिश्चित करेल” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 74व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित करताना ‘One Nation One Health Card’ संदर्भात भाष्य केले. One Nation One Ration Card सारखेच हे कार्ड असणार आहे. पंतप्रधानी घोषणा केलेल्या ‘नॅशनल डिजीटल हेल्थ मिशन’ या अभियानाअंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकाचे हेल्थ आयडी तयार केले जाणार आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्यासंदर्भातील सर्व माहिती या प्लॅटफॉर्मवर असणार आहे. यामध्ये संबंधित व्यक्तीवर कोणते उपचार झाले आहेत, निदान काय आहे, कोणत्या उपचारांची आवश्यकता आहे यांसारखे डिटेल्स या कार्डमध्ये असतील.

आजपासून या मिशनची सुरुवात होत असून आरोग्य क्षेत्रासाठी ही मोठी क्रांती असेल असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, नागरिकांचा उपचाराचा खर्च कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, त्यासाठी प्रत्येकाला एक आरोग्य आ़यडी दिले जाईल. संबंधित नागरिकाच्या स्वास्थ्याबाबत त्यात माहिती असेल. यामुळे त्याला उपचार घेणे सोपे होईल.

 

News English Summary: In his address to the nation on India’s 74th Independence Day, Prime Minister Narendra Modi Saturday launched the National Digital Health Mission that he said would “revolutionize” the country’s health sector. Under the mission, he said, every Indian would receive a unique health identity card.

News English Title: Prime Minister Narendra Modi announces national digital health mission health ID card for Indians know the benefits News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x