बिहार निवडणुक | भाजपच्या महत्वाच्या नेत्यांना कोरोनाची लागण | प्रचारावर परिणाम

पाटणा, २४ ऑक्टोबर : बिहार विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात रंगत आली असून राजकीय पक्षांकडून घोषणांचा पाऊस पडत आहेत. भाजपा, जयदूने आपल्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा केल्यानंतर आता लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलानेही मोठ्या घोषणा करत, पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. राजद नेते तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन, पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ‘प्रण हमारा संकल्प बदलाव का’ असे नाव देण्यात आले आहे. या जाहीरनाम्यातही युवकांना केंद्र स्थानी ठेवण्यात आले आहे.
राजदच्या जाहीरनाम्यात 17 मुद्द्यांना स्थान देण्यात आले असून 10 लाख युवकांना नोकरी देण्याचा संकल्प तेजस्वी यादव यांच्या पक्षाने मांडला आहे. त्यासोबतच, शेती, शिक्षण याही मुद्द्यांना स्थान देण्यात आलंय. राजदच्या 16 पानी जाहीरनाम्यात सत्ता आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये 10 लाख युवकांना नोकरीसंदर्भात प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे म्हटले आहे.
दुसरीकडे बिहारच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे बिहार प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी, पक्षाचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यांना कोरोनाची लागण झाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटरवरुन त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, ‘लॉकडाऊनपासून ते सतत काम करत होते, परंतु कदाचित त्यांन थोडी विश्रांती घ्यावी ही देवाची इच्छा आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे आणि मी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व आवश्यक औषधे आणि उपचार घेत आहे.’
बिहारमधील भाजप नेत्यांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिहार निवडणुकीची जबाबदारी होती. त्याच्या शिवाय सुशील मोदी, शाहनवाज हुसैन आणि राजीव प्रताप रुडी यांच्या सारख्या महत्त्वाच्या नेत्यांना ही कोरोनाची लागण झाल्याने याचा फटका निवडणूक प्रचारात बसणार आहे.
News English Summary: The BJP has suffered a major blow during the Bihar election campaign. BJP’s Bihar in-charge and former Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis has also contracted corona. Earlier, state Deputy Chief Minister Sushil Modi, party spokesperson Shahnawaz Hussain and former Union Minister Rajiv Pratap Rudy were infected with the corona.
News English Title: Bihar Assembly Election 2020 BJP leaders corona positive during News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vaibhav Jewellers IPO | आला रे आला IPO आला! वैभव ज्वेलर्स IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, शेअर प्राईस बँडसह तपशील जाणून घ्या
-
Multibagger Stocks | यादी सेव्ह करा! हे शेअर्स अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढवत आहेत, स्टॉक तपशील वाचा
-
Wheat Prices Hike | हिंदू-मुस्लिम-पाकिस्तान बातम्यांमध्ये आनंद घेणाऱ्या मतदारांसाठी आनंदाची बातमी, गहू आणि पीठ महाग होणार
-
Kody Technolab IPO | यापूर्वी संधी हुकली? आता कोडी टेक्नोलॅब IPO लाँच झाला, पहिल्याच दिवशी देईल मजबूत परतावा
-
Kahan Packaging IPO | मार्ग श्रीमंतीचा! 80 रुपयाच्या IPO शेअरने फक्त एकदिवसात 100 टक्के परतावा दिला, आर्थिक स्ट्रार तेजीत
-
Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर! अल्पावधीत 115 टक्के परतावा देणाऱ्या शक्ती पंप्स शेअरने 1 दिवसात 12 टक्के परतावा दिला
-
CCD Share Price | कडक कॉफी! कॅफे कॉफी डे शेअर्समध्ये पुन्हा अप्पर सर्किटची मालिका, एका महिन्यात 37% परतावा
-
Numerology Horoscope | 18 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
-
BJP Election Marketing | मंगलमूर्ती बाप्पाच्या नावाने सुद्धा 'मोदी मार्केटिंग' राजकारण, कोकणासाठी विशेष ट्रेन 'नमो एक्स्प्रेस'चे उद्घाटन
-
Waree Renewable Share Price | मार्ग श्रीमंतीचा! वारी रिन्यूएबल शेअरने 3 वर्षात 1 लाखावर दिला 80 लाख रुपये परतावा, पुढेही मल्टिबॅगर