28 January 2023 7:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | मल्टिबॅगर स्टॉक नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, सर्वाधिक परतावा देणाऱ्या योजनेची डिटेल्स पहा Horoscope Today | 29 जानेवारी 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Hindenburg Report Adani Group | अदानी ग्रुपबाबत हिंडेनबर्गचा अहवाल 'अत्यंत विश्वासार्ह'!, दिग्गज अब्जाधीश विल्यम एकमन Numerology Horoscope | 29 जानेवारी, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल? तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Bank Balance on WhatsApp | तुमच्या व्हॉट्सॲपवर समजेल तुमचा बँक बॅलन्स, जाणून घ्या प्रक्रिया Speciality Restaurants Share Price | रेस्टॉरंट चेन चालवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 170% परतावा दिला, आता स्टॉक नवीन टार्गेटच्या दिशेने Poonawalla Fincorp Share Price | करोडपती केलं या शेअरने! फक्त 22 हजारांच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा, स्टॉक पुन्हा तेजीत
x

नाणारवासियांच्या व विरोधकांच्या लढ्याला यश, रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द

Konkan Nanar Refinery project

रत्नागिरी : विरोधी पक्ष आणि स्थानिक नागरिकांसह संपूर्ण कोकणातून जोरदार विरोध होत असलेला नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्प रद्द करण्याची आज अधिकृत घोषणा केली आहे. तसेच या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.

दरम्यान, नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याबाबत प्रसार माध्यमांना माहिती देताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की,”स्थानिकांच्या विरोधामुळे नाणार प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेली शेतकऱ्यांची जमीन त्यांना परत देेण्यात येईल. तसेच जमिनींच्या सातबारावर असलेला एमआयडीची शिक्काही हटवण्यात येईल. त्याबरोबरच आता ज्या भागात या प्रकल्पासाठी स्थानिक जनता अनुकूल असेल, अशा ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात येईल.”

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पूर्वीच घोषणा करावी अशी जोरदार मागणी मागील काही महिन्यांपासून करण्यात येत होती. स्थानिकांच्या संघर्ष समितीने देखील नाणार प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच नाणार परिसरातील रहिवासी, मुंबईकर मंडळी आणि कोकणातील पर्यावरण प्रेमींनी या प्रकल्पाविरोधात तीव्र भूमिका घेतली होती.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x