14 December 2024 11:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या
x

शौर्य डोवल, पाकिस्तानी बिझनेस पार्टनर सय्यद अली अब्बास, ते RSS व भाजप कनेक्शन

Shaurya Doval, RSS, BJP, Pakistani Business Partner

नवी दिल्ली : ‘द वायरने’ काही महिन्यांपूर्वी देशाचे पाचवे आणि विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचे पुत्र शौर्य डोवल यांच्या व्यवसायांविषयी भारतीयांना सविस्तर माहिती देणार वृत्त प्रसिद्ध केलं होतं. मात्र, देशातील पेड आणि सत्ताधारी धार्जिण्या प्रसार माध्यमांच्या वादळात ते हवेतच लुप्त झालं आणि भारतीय नागरिकांकडे ते पोहचू शकलं नाही किंवा पोहोचणार नाही याचीच दक्षता घेतली गेली असावी. देशाच्या राजकारणात अजित डोवाल हे पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असावे ज्यांचा समाज माध्यमांवर अप्रत्यक्षपणे प्रचार सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनीच करून त्यांना भारताचे जेम्स बॉण्ड अशी पदवी देखील बहाल केली आणि वास्तविक ते एक निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. परंतु असं काय झालं की त्यांच्यासाठी भाजप सत्ताधाऱ्यांचा आयटी सेल नेहमीच कार्यरत असतो आणि समाज माध्यमांवरून त्यांच्याबद्दल बातम्या पेरण्याचं काम करत असतो.

सत्ताधाऱ्यांच्या आयटी सेल ने भारतीय लष्करासारख्या भावनिक विषया आडून तसेच समाज माध्यमांच्या माध्यमातून दूरदर्शी अभियान राबवलं आणि या दोन व्यक्तींना थेट भाजपशी जोडलं. त्यातील एक व्यक्ती म्हणजे अजित डोवल आणि दुसरी व्यक्ती म्हणजे अभिनेता अक्षय कुमार. दरम्यान, राज ठाकरे यांनी अजित डोवल यांच्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करताच सत्ताधाऱ्यांचा आयटी सेल का चवताळून उठला याचा तुम्हाला अंदाज येईल. कारण सोनिया गांधी इटालियन असल्या तरी त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारलं होतं. परंतु, इटालियन नावाने राजकारण करणाऱ्या भाजप आणि नरेंद्र मोदींच्या २०१० पासूनच संपर्कात असणाऱ्या कॅनेडियन अक्षय कुमारला असंच अभियान राबवून भारतीय लष्कर आणि नंतर भाजपशी जोडलं. तो राज्यसभेवर जाणार इतक्यातच २ दिवस आधी राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत भाजपचा खेळ उधळला होता. परंतु, सदर वृत्त अक्षय कुमारशी संबंधित नसल्याने त्यासंबंधित सविस्तर व्हिडिओ पुराव्यानिशी सविस्तर माहिती इथे वाचावी क्लिक करा.

सर्वप्रथम शौर्य डोवल आरएसएस आणि भाजपशी जोडल्याचे आम्ही नाही तर हे त्यांच्याच अधिकृत (वेबसाईटवर क्लिक करा) पुरावे पाहा. अजित डोवल यांचे पुत्र शौर्य डोवल आणि इंडिया फाॅऊंडेशनच्या नावाने एक थिंक टँक चालवणारे शौर्य डोवलने ‘बुलंद उत्तराखंड’च्या बॅनरखाली देहरादूनमधे ‘बेमिसाल गढवाल’चा प्रचार सुरू केला. दरम्यान, आगामी लोकसभेची जागा भाजपाच्या तिकिटावर लढणार असल्याच्या चर्चेबद्दल विचारले असता शौर्य यांनी काहीही बोलण्यास नकार दिला होता.

मागील वर्षापासून शौर्य डोवल यांच्या सक्रीय राजकारणातील प्रवेशाची चर्चा आहे. शौर्य डोवल भाजपाच्या बऱ्याच रॅली आणि कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेताना दिसत आले आहेत. २०१७ च्या सुरुवातीला सतपाल महाराजांच्या आणि प्रचारात मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंहांच्या नेतृत्वातील फाॅऊंडेशन कार्यक्रमात सहभागीही झाले होते. परंतु, ते खऱ्या अर्थाने चर्चेला तेव्हा आले, जेव्हा ‘द वायर’ ने शौर्य डोभाल यांच्या कंपनीत एक पाकिस्तानी बिजनेस पार्टनर सैयद अली अब्बास आणि सऊदी राजकुमार मिशाल बिन अबदुल्लाह बिन तुर्की बिन अबदुल्लाज़ीज़ अल साऊद देखील पार्टनर असल्याचं वृत्त दिलं होतं. विशेष म्हणजे असे व्यावसायिक संबंध इतर कोणाचे असले असते तर भाजपने त्यांना कधीच देशद्रोही घोषित केले असत. कारण देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवल यांच्या मुलाचे थेट पाकिस्तानी नागरिक असलेल्या सैयद अली अब्बास और सौदीच्या प्रिंस सोबत ‘जेमिनी फाइनेंशियल सर्विसेस’ नावाने कंपनी होती. त्याची देखील अधिकृत वेबसाईट होती. परंतु, २०१७ मध्ये प्रसार माध्यमांमध्ये येताच सादर वेबसाईट शटडाऊन करण्यात आली होती.

विशेष म्हणजे बिहार विधानसभेच्या प्रचारादरम्यान जर भाजप हरली तर पाकिस्तानमध्ये फटाके वाजतील असं वक्तव्य अमित शहांनी केलं होतं. धक्कादायक म्हणजे शौर्य डोवल चालवत असलेल्या इंडिया फाउंडेशन या थिंक टॅंक मध्ये ४ केंद्रीय मंत्री निर्देशक म्हणून कार्यरत होते. त्यात स्वतः संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण देखील होत्या. तसेच दुसरं महत्वाचं म्हणजे इंडिया फाउंडेशनची स्थापना शौर्य डोवल यांनी भाजपाचे महासचिव राम माधव यांच्यासोबत केली होती. सदर विषय उघड करण्यामागे भाजप इतरांना पाकिस्तान या विषयावरून थेट देशद्रोही असा शिक्का मारत आलं आहे. परंतु देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा मुलगा पृथ्वीतलावर थेट पाकिस्तानी बिझनेस पार्टनर शोधतो यावर भाजपाला काहीच आक्षेप नव्हता असं ‘द वायर’ने म्हटलं होतं ते येथे क्लिक करून पहा. त्यामुळेच राज ठाकरे यांनी याच विषयाचा संदर्भ देत अजित डोवल यांच्या चौकशीची मागणी केली होती. परंतु प्रसार माध्यमांनी त्याला वेगळंच वळण दिल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे अजित डोवल त्यांचे पुत्र आणि भाजपचे नेते शौर्य डोवल राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर विरोधकांच्या कचाट्यात येण्याआधीच सदर विषयाला लष्कराशी आणि एअर स्ट्राईकशी जोडत त्यांना विखारीपणे लक्ष केलं. भाजप आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या नावाने त्यांच्या सार्थकांनी तयार केलेल्या फेसबुक ग्रुपवर राज ठाकरे यांना देशद्रोही ठरविण्याचे जोरदार अभियान सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी मराठी भाषेत केलेले आरोप पाकिस्तानी वाहिन्यांना कसे समजले? दुसरं वास्तव हे आहे की राज ठाकरे पाकिस्तानमधील “सर्व टिलिव्हिजन न्यूजवर” हिरो म्हणून झळकत असल्याचा प्रचार केला गेला. परंतु, त्यामागील वास्तव हे आहे की GNNHD.TV हे पाकिस्तानव्याप्त पंजाबमधील मुलतान मधून चालवलं जाणारं पाकिस्तानी “न्यूज पोर्टल” आहे आणि त्याचा टिलिव्हिजन न्यूजशी काहीही संबंध नाही. त्याव्यतिरिक्त कोणत्याही पाकिस्तानी चॅनेलवर ते दाखवण्यात आली नाही. त्यासाठी आम्ही पाकिस्तानमधील सर्व टिलिव्हिजन न्यूजची यादीच तुम्हाला खाली देत आहोत आणि तुम्हीच पाहा GNNHD.TV असा कोणताही पाकिस्तानी टेलिव्हिजन नाही.

त्यात महत्वाचं म्हणजे आज अनेक न्यूज पोर्ट्लसाठी बाजारात रेडिमेड बॅकग्रान्ड डिस्प्ले मिळतात, ज्यामुळे पोर्टल देखील फेसबुक किंवा व्हाट्सअँप’वर पाहिल्यास टेव्हीजन न्यूज सारख्या भासतात. सर्वात मोठा खुलासा आम्ही हा करत आहोत की, GNNHD.TV हा वेबसाईट डोमेन ‘गॉर्मेट फूड्स” या पाकिस्तानी कंपनीच्या नावाने रजिस्टर्ड असून ती एक फूड प्रॉडक्ट्स कंपनी आहे. तसेच हीच कंपनी सदर न्यूज पोर्ट्ल चालवते. त्याचा पुरावा देखील आम्ही खाली देत आहोत किंवा तुम्ही देखील “येथे क्लिक करा” आणि स्वतःच व्हिजिट करा आणि नंतर GNN पर्यायावर क्लीक करा.

त्यामुळेच कोणातरी भारतातूनच राज ठाकरे यांच्या आरोपाचे मूळ मराठीचे हिंदीत ट्रान्सलेशन करून संबंधित वेबपोर्टलला त्यांच्या मेसेंजरवरून धाडले असावे आणि त्यामुळे त्यांनी राज ठाकरे यांचा मूळ मराठीतील व्हिडिओ उर्दू बातमीत न दाखवता, केवळ राज ठाकरे यांच्या छायाचित्रांच्या काही स्लाईड जोडून ऍडमिन मेसेंजरवरील हिंदीचे उर्दूत व्हॉईसओव्हर देऊन प्रसारित केले आणि पाकिस्तानची पाठ थोपटवली. त्यानंतर हा व्हिडिओ संबंधित वेबपोर्टलवर प्रसारित होताच तो डाउनलोड करून, त्याला देखील एडिट करून ‘पाकिस्तान का नया हिरो’ अशा मथळ्याने व्हिडिओ बनवून सत्ताधाऱ्यांच्या आयटी सेलने आणि समर्थकांनी ते फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअँप’वर जोरदारपणे व्हायरल केले आणि भावनिक वातावरणात राज ठाकरे यांना देशद्रोही ठरवण्याचा विकृत प्रचार सुरु केला. मुळात तिथल्या कोणत्याही मोठ्या आणि अधिकृत टेव्हिव्हिजन न्यूजवर ही बातमी नव्हती, परंतु सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी एअर स्ट्राईकच्या नावाने भावनिक वातावरणाचा फायदा उचलत सकाळ पासूनच स्वतःच्या पक्षाचा विखारी अजेंडा राबवला. सत्ताधाऱ्यांच्या काही विकृत ट्रॉलर्सने अगदी वीर पत्नींना देखील सोडलं नाही, ज्यांनी स्वतःच्या घरातील अनमोल सदस्य गमावला आणि त्यानंतर देखील शांततेचा संयमी संदेश दिला.

 

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x