15 August 2022 12:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Xiaomi CyberOne Robot | शाओमीने तयार केला स्मार्ट रोबोट, काम करताना मनुष्याच्या भावनेनुसार विचार करू शकणार Multibagger Mutual Funds | या 3 जबरदस्त मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना लक्षात ठेवा, SIP ने 3 वर्षात लाखोंचा फायदा Horoscope Today | 15 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 2023 Kia Ray | 2023 किआ रे कार लाँच, जबरदस्त लूकसह मिळणार शानदार असे फीचर्स Viral Video | तो बाईक सहित खड्ड्यात पडला की खड्ड्यातून वर आला?, विचित्र अपघाताचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय अमित शहांनी फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनवलं | तर फडणवीसांनी मुनगंटीवार आणि चंद्रकांतदादांचं राजकीय वजन घटवलं शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचं खातेवाटप | दादा भुसेंकडून कृषी खातं सत्तारांकडे, शिंदेंकडून मूळ शिवसैनिकांना हलकी खाती
x

भारतात पॉर्न साईट्सवर बंदी घाला; नितीश कुमार यांची पंतप्रधानांकडे मागणी

Bihar Chief Minister Nitish Kumar, PM Narendra Modi

नवी दिल्ली: संयुक्त जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यांनी या पत्रात इंटरनेटवरील पॉर्न साईट्स आणि अश्लिल मजकुरावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. बलात्कारासारख्या घटनांसाठी पॉर्न साईट्सच जबाबदार असतात, असं वक्तव्य यापूर्वी त्यांनी केलं होतं.

इंटरनेटवरील लोकांच्या अमर्याद प्रवेशामुळे मुले आणि तरुण अश्लील, हिंसक आणि अनुचित सामग्री पाहत आहेत. जे अनिष्ट आहे. इंटरनेटच्या प्रभावामुळे अशा काही घटना घडत असतात. बर्‍याचदा अशा प्रकरणांमध्ये गैरवर्तनाच्या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडिया – व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक इत्यादीवर तयार केले जातात आणि व्हायरल केले जात आहे. विशेषकरून या प्रकारच्या सामग्रीचा लहान मुले आणि काही तरूणांच्या मेंदूवर गंभीर परिणाम होत आहे, असे नितीश कुमार यांनी पत्रात म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयानेही यासंदर्भात सरकारला अनेक मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मात्र, इंटरनेट सेवा देणाऱ्यांनाही कडक सूचना देणे आवश्यक आहे. याशिवाय, पालक, शैक्षणिक संस्था आणि अशासकीय संस्था यांच्या सहकार्याने सर्वसमावेशक जागरूकता मोहीम राबविणे देखील आवश्यक असल्याचेही नितीश कुमार यांनी पत्रात नमूद केले आहे.

अशा प्रकारच्या डेटामुळे अनेकांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. तसंच महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कायद्यामध्ये काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. परंतु त्यांची योग्यरित्या अंमलबजावणी होत नसल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.

 

Web Title:  Banned On Porn Sites in India Says Bihar CM Nitish Kumar to PM Narendra Modi.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1659)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x