3 May 2024 5:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल
x

राफेल डील: ना पंतप्रधान, ना संरक्षणमंत्री तर अर्थमंत्री उत्तर का देतात? - खासदार सौगत राय

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत राय यांनी राफेल करारावरून नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळावर बोचरी टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाला राफेल लढाऊ विमानांच्या करारावर बोलण्यासाठी राज्यसभेचा सदस्य सापडला. भाजपचे लोकसभेत ३०० खासदार असूनही राज्यसभेतला माणूस इथे येऊन नरेंद्र मोदी सरकारची बाजू मांडत आहे. विशेष म्हणजे राज्यसभेचे सदस्य असलेले अरुण जेटली हे संरक्षण मंत्री सुद्धा नाहीत. तरी पण ते स्वतःला राफेल लढाऊ विमानांच्या करारातील तज्ज्ञ समजतात.

आमच्या पक्षाला जेटलींसारखं केवळ ‘तूतू-मैं मैं’ मध्ये अडकण्याचा काहीच रस नाही. खरं तर नरेंद्र मोदी हे रामायण काळातील मेघनाद आहेत. त्यामुळेच ते अर्थमंत्री अरुण जेटलींच्या पाठीमागे लपत आहेत. त्यामुळे आधी नरेंद्र मोदींनी संसदेचा सामना करण्याची हिंमत दाखवावी आणि जेपीसी गठीत करून संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या राफेल कराराची चौकशी केली पाहिजे असं सौगत राय म्हणाले.

दरम्यान, मोदी सरकारनं या करारात विमानांच्या किमती का वाढवल्या ते सभागृहाच्या समोर आलं पाहिजे. तसेच राफेल लढाऊ करारासाठी HAL ऐवजी एका खासगी कंपनीला ऑफसेट भागीदार का बनवण्यात आलं, याचं सुद्धा भारतीय जनता पक्षाने उत्तर द्यावं, असं खासदार सौगत म्हणाले आहेत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x